वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ आपला अखेरचा साखळी सामना रविवारी (12 नोव्हेंबर) खेळेल. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय संघ नेदरलँड्सशी दोन हात करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघासाठी संमिश्र कामगिरी केलेल्या श्रेयस अय्यर याच्याबद्दल आता भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठे विधान केले आहे.
विश्वचषकाआधी दुखापतीतून बरा होत श्रेयस याने संघातील आपली जागा कायम राखली. स्पर्धेच्या सुरुवातीला त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. तरीदेखील आठ सामन्यात त्याने तीन अर्धशतके झळकावून आपले योगदान दिले. श्रीलंका व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध त्याने आक्रमक खेळाचा नजराणा पेश केला. त्याच्या याच खेळाबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाले,
“श्रेयस हा असा खेळाडू आहे जो दबावात अधिक चांगली कामगिरी करतो. त्याची मानसिकता आणि एकाग्रता चांगली आहे. त्याच्यात सुधारणेला नक्कीच वाव आहे. मात्र, त्याच्या योग्यतेला आपण केवळ धावांवर मोजायला नको. त्याने भारतासाठी योग्य वेळी महत्त्वाच्या खेळ्या केल्या आहेत.”
श्रेयस यावर्षी मार्च महिन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे आयपीएल व जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना तो खेळू शकला नव्हता. अशात त्याने आशिया चषकात पुनरागमन केलेले. मात्र, तिथे देखील तो दुखापतग्रस्त झालेला. विश्वचषका आधी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत शानदार शतक झळकावून त्याने आपण विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे म्हटलेले.
(Rahul Dravid Speak On Shreyas Iyer Form In World Cup)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धचा सामना माझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, इंग्लंडच्या खेळाडूचं धक्कादायक विधान
शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्यावर लागली मोहर! खास व्यक्तिने महत्वाची माहिती