---Advertisement---

टीम इंडियाचा नवा हेडकोच बनल्यावर काय म्हणाला द्रविड? वाचा सविस्तर

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 10:38 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली आहे. विश्वचषकानंतर विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे पदावरून बाजूला होणार आहेत. त्यांच्या जागेवर भारताचा माजी कर्णधार व सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद सांभाळणारा राहुल द्रविड याची नियुक्ती केली गेली आहे. बीसीसीआयने याबाबतची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व राहुल द्रविड यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

मी द्रविडचे स्वागत करतो
एकेकाळी राहुल द्रविडचे संघ सहकारी असलेले विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी द्रविडचे स्वागत करताना म्हटले,
“मी बीसीसीआयतर्फे राहुल द्रविडचे भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करतो. राहुलची खेळाडू म्हणून कारकीर्द उत्कृष्ट होती. तो या खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणूनही त्याने भारतीय क्रिकेटसाठी विशेष कामगिरी केली आहे. एनसीएमध्ये राहुलच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक क्रिकेटपटू तयार झाले आहेत. त्याचा नवा कार्यकाळ भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाईल, अशी मला आशा आहे.”

हा माझा सन्मान
आपल्या नियुक्तीनंतर बोलताना द्रविड म्हणाला,
“भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त होणे हा माझा सन्मान असून, मी या भूमिकेसाठी उत्सुक आहे. शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली संघाने खूप चांगली कामगिरी केली. मला आशा आहे की, ते पुढे नेण्यासाठी मी संघासोबत काम करेल. एनसीए, अंडर १९ आणि भारत अ सेटअपमध्ये बहुतेक खेळाडूंसोबत जवळून काम केल्याने मला माहित आहे की, त्यांना दररोज सुधारणा करण्याची आवड आणि इच्छा आहे. पुढील दोन वर्षांत काही मोठ्या स्पर्धा होणार आहेत. आमचे लक्ष साध्य करण्यासाठी मी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

अनेक दिवसांपासून सुरू होती चर्चा
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ विश्वचषकानंतर समाप्त होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक तसेच सहाय्यक प्रशिक्षकांच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. सौरव गांगुली व बीसीसीआय सचिव जय शहा यांनी द्रविड याला या पदावर काम करण्यासाठी राजी केल्याचे बोलले जात होते. त्यानंतर द्रविड याने अधिकृतरीत्या या पदासाठी अर्ज केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘केवळ तिकिट घेऊनच स्टेडियममध्ये प्रवेश करा,’ राशिदची भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना विनंती

राहुल द्रविड दिसणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी, बीसीसीआयची अधिकृत घोषणा

स्कॉटलंडविरुद्ध ९३ धावांची खेळी करताच मार्टिन गप्टीलने केली ‘हिटमॅन’ रोहितची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---