सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे १ जुलैपासून कसोटी सामना खेळणार आहे. उभय संघांमधील गेल्या वर्षी झालेल्या मालिकेतील हा पूर्वनियोजित कसोटी सामना आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी, ओल्ड ट्रॅफर्ड येथे १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ५व्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी कोविड१९ च्या वाढत्या प्रकरणांमुळे सामना पुढे ढकलण्यात आला होता.
आता दोन्ही संघ व्यवस्थापनापासून प्रशिक्षक-कर्णधारापर्यंत बदलले आहेत. रोहित शर्मा आता विराट कोहलीच्या ऐवजी कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारत आहे तर रवी शास्त्रीचा कार्यकाळ या वर्षी संपल्यानंतर राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. दुसरीकडे इंग्लंडकडेही बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलमच्या रूपाने नवी कर्णधार-प्रशिक्षक जोडी आहे. या सामन्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, इंग्लंडमध्ये गेल्या वर्षीसारखे नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील ५ वा टी२० सामना पावसात वाहून गेल्यानंतर प्रशिक्षक द्रविड म्हणाले की, “इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणे हा नेहमीच चांगला अनुभव असतो. प्रेक्षक जबरदस्त असणार आहेत. इंग्लंडमध्ये जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला खरोखरच चांगल्या दर्शकांची अपेक्षा असते. इंग्लंडचा संघही चांगला खेळत आहे. आता थोडी वेगळी परिस्थिती आहे, गेल्या वर्षी जेव्हा आम्ही तिथे होतो तेव्हा इंग्लंड कदाचित बॅकफूटवर असेल पण त्यांनी काही चांगले सामने खेळले आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “आमच्याकडेही खूप चांगली टीम आहे. आशा आहे की तो एक चांगला सामना होईल. मला कसोटी क्रिकेट पाहणे आवडते, मला ते खेळायला आवडते, मला त्याचे प्रशिक्षण देणे आवडते. मी त्यासाठी तयार आहे. हा कसोटी सामना रोमांचक होणार आहे. आमच्यासाठी, ही एक नवीन कसोटी आहे, परंतु ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणांशी जोडलेली आहे. ज्या खेळाडूंनी मालिकेत चांगली कामगिरी केली आणि आघाडी मिळवण्यात भूमिका बजावली, त्यांच्यासाठीही हे महत्त्वाचे आहे. मालिका जिंकून चांगली कामगिरी करण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत.”
दरम्यान, १ जुलै पासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात भारतासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल हो सलामीवीराची भुमिका बजावतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन कोरोना पॉसिटीव्ह झाल्याने तो या सामन्यात अनुपस्थितीत राहण्याची शक्यता नाकरता येत नाही. हा भारतासाठी मोठा झटका ठरू शकतो
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तो अजून शिकत आहे’, भारताच्या माजी दिग्गजाने केली पंतची पाठराखण
इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा झटका!, दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण
ENGvsIND: चेतेश्वर पुजारा नाही तर ‘हा’ खेळाडू कॅप्टन शर्मासोबत येणार सलामीला, बीसीसीआयने दिले संकेत