सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिशेल याने लगावलेला एक षटकार थेट स्टँड्स मध्ये बियरपित असलेल्या महिलेचा ग्लास फोडला होता. या व्हिडिओनंतर क्रिकेटजगतातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या व्हिडिओत भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि सध्याचा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने मारलेला षटकार आहे.
भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात २४ ऑगस्ट २००७ रोजी ब्रिस्टलमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्याच्या ४९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर राहुल द्रविडने (Rahul Dravid) जेम्स अँडरसनला (James Anderson) ऑफ साइडमध्ये फ्लॅट षटकार ठोकला. चेंडू थेट प्रेक्षकाच्या ग्लास मध्ये जाऊन पडला. चेंडू पडल्याने प्रेक्षक बिअरमध्ये भिजला होता. मात्र, त्यात तो खूश होता. तो त्याच्या जागेवर उभा राहिला आणि सर्वांना अभिवादन करायला लागला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, या सामन्यात राहुल द्रविडने विध्वंसक फलंदाजी केली होती. त्याने ६३ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकार मारून नाबाद ९२ धावांची खेळी केली. दुसरीकडे सचिन तेंडुलकरने ९९ आणि युवराज सिंगने ४९ धावा केल्या होत्या. भारताने ७ बाद ३२९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला ८ बाद ३२० धावा करता आल्या आणि ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्याच्यासाठी इयान बेलने सर्वाधिक ६४, दिमित्री मस्करेन्हासने ५२ धावा केल्या. भारताकडून मुनाफ पटेल आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी ३, तर आरपी सिंग आणि रमेश पवार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
INDvsSA । ‘या’ ६ खेळाडूंची कामगिरी दुसऱ्या टी२० सामन्यात ठरणार निर्णायक, टाका एक नजर
काव्या मारन ते प्रीती झिंटा, ‘या’ आहेत ग्लॅमरचा तडका लावणाऱ्या आयपीएल संघांच्या मालकीणबाई






