आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी संघ तयार करण्यासाठी १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव पार पडला. या लिलावानंतर संघ तयार झाले आहेत. लिलावात सर्वात महागडा खेळाडू इशान किशन होता. तर आयपीएलच्या १५ व्या हंगामात मैदानावर उतरणाऱ्या खेळाडूंपैकी केएल राहुल (K L Rahul) हा सर्वात महागडा खेळाडू असणार आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्स संघाने १७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.
रोहित शर्माला मुंबई इंडियन्स, रविंद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्सने तर रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने १६ कोटी रुपये देवून खरेदी केले आहे. खेळाडूंना विकत घेण्याच्या बाबतीत जगातील बाकी क्रिकेट लीगमध्ये आयपीएल ही सर्वात पुढे आहे. पाकिस्तान सुपर लीग, बीग बॅश लीग यांपैकी भारताच्या इंडीयन प्रिमीयर लीगच्या स्पर्धेत कोणीच नाही.
बाबर आझम हा पीएसएल या लीगमधील सर्वात महागडा खेळाडू असून त्याची किंमत १.३० कोटी एवढी आहे. म्हणजेच आयपीएलच्या सर्वात महागड्या केएल राहुलची किंमत पाकिस्तानच्या सर्वात महागड्या खेळाडूपेक्षा १३ पट जास्त आहे. पाकिस्तानमध्ये १.३० कोटी रुपयांचा एक स्लॅब तयार करण्यात आला आहे. बाबरशिवाय अन्य तीन खेळाडूंनाही तेवढीच रक्कम मिळते.
ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगच्या सर्वात महागद्या खेळाडूची किंमत दोन कोटी रुपये एवढी आहे. फलंदाज डी’आर्सी शॉर्टला ही रक्कम दिली जाते. बीबीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूच्यापेक्षा राहुलची किंमत आठपट जास्त आहे.
वेस्ट इंडिजच्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानला सर्वाधिक ८५ लाख रुपयांना खरेदी केले आहे. रशीद खानच्या किमतीच्या 20 पट जास्त किंमत केएल राहुलची आहे. लिलाव हे मुख्य कारण आहे की खेळाडूंना आयपीएलमध्ये इतकी किंमत मिळते, जे जगातील इतर कोणत्याही क्रिकेट लीगमध्ये मिळत नाही.
आयपीएलमध्ये खेळाडू लिलावाद्वारे संघाचा भाग बनतात. लिलावात एखाद्या खेळाडूला जो संघ सर्वाधिक बोली लावेल त्या संघाला तो खेळाडू मिळतो किंवा खेळाडू रिटेन केले जातात. यावर्षी राहुलची निवड लखनऊने ड्राफ्टमधून केली होती. बीबीएल, पीएसएल आणि सीपीएलसह इतर सर्व क्रिकेट लीगमध्य खेळाडू ड्राफ्टच्या माध्यमातून संघांचा भाग बनतात.
या तिन्ही लीगमध्ये ड्राफ्टमध्ये संघ स्वत: खेळाडूंसोबत करार करतात. यामध्ये लिलावाची संकल्पना नसते. किमतीचा एक निश्चित स्लॅब बनवला जातो आणि प्रत्येक संघाला त्या पगाराच्या स्लॅबमध्ये काही निवडक खेळाडू ठेवावे लागतात. या कारणामुळे आयपीएल ही जगातील सर्व लीगांपेक्षा वेगळी आणि विशाल आहे. जगभरातील सर्वच खेळाडूंना आयपीएलचा भाग व्हायचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात वफादारी! ‘या’ ५ खेळाडूंनी कधीच दिला नाही संघमालकांच्या विश्वासाला तडा (mahasports.in)