भारतीय क्रिकेटर के एल राहुलने त्याचे सासरे सुनील शेट्टी यांच्यासोबत मिळून 7 एकर जमीन खरेदी केली आहे. त्यांनी पश्चिम ठाणे ओवाले एरियामध्ये हा जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे. भारतात प्रॉपर्टीचा डाटा साठवून ठेवणारी कंपनी स्क्वायर यार्ड्स यांच्यानुसार राहुल आणि सुनील शेट्टी यांनी ही प्रॉपर्टी मार्च 2025 मध्ये खरेदी केली आहे. यासाठी त्यांनी 9.85 करोड रुपये दिले आहेत. तसेच त्यासाठी त्यांना 68.96 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी 30 हजार रुपये द्यावे लागले आहेत.
ही जमीन पश्चिम ठाणेच्या ओवाले क्षेत्र घोडबंदर रोडच्या तिथे स्थित आहे. हे क्षेत्र मुंबई, ठाणे आणि पश्चिम इलाक्यांमधील स्थित असलेल्या नगरांसाठी बिझनेसच्या दृष्टीतून खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. तसेच राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी मागच्या वर्षी बांद्राच्या पाली हिलमधील संधू पॅलेसमध्ये 3350 स्क्वेअर फिट असलेला लक्झरी अपार्टमेंट सुद्धा खरेदी केला होता. ज्याची किंमत 20 करोड पेक्षा अधिक सांगितली जात होती. त्या अपार्टमेंटमध्ये राहुलच्या परिवाराला चार पार्किंग स्पॉट देण्यात आले आहेत. या आलिशान अपार्टमेंट खरेदीवर राहुल आणि अथिया यांना 1.20 करोड रुपयांची स्टॅम्प ड्युटी द्यावी लागली होती.
के एल राहुलच्या घरी मागच्या काही आठवड्यांपूर्वी एका लहान पाहुण्याने जन्म घेतला आहे. 24 मार्च 2025 रोजी के एल राहुल बाबा झाला आहे, ज्या कारणाने आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिले काही सामने तो खेळू शकला नाही.
IPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत असलेला के एल राहुलने 4 डावात दोनशे धावा केल्या आहेत. राहुल या हंगामात 164 च्या तुफानी स्ट्राइक रेटने खेळत आहे आणि आत्तापर्यंत खेळलेल्या 4 डावात त्याने दोन अर्धशतक झळकावली आहेत. आताच्या हंगामात दिल्ली कॅपिटलसाठी सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू राहुल आहे.