भारतातील अनेक क्रिकेटपटू मागील काही महिन्यांत विवाह बंधनात अडकले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा आणि राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटही बोहल्यावर चढला. आता राजस्थान रॉयल्सच्याच अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवातियाने देखील साखरपुडा केला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
राहुल तेवातियाने ट्विटरवर त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचे फोटो पोस्ट करत साखरपूडा झाल्याची गोड बातमी दिली. त्याने फोटोंच्या कॅप्शनमध्ये ३.२.२०२१ अशी साखरपूड्याची तारिखही सांगितली आहे.
3.2.2021 💍❤️ pic.twitter.com/ERRbWbWuOk
— Rahul Tewatia (@rahultewatia02) February 4, 2021
राहुल तेवातेया मागील काही काळात इंडियन प्रीमीयर लीगमधील कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला होता. त्याने संयुक्त अरब अमिराती येथे पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान शानदार अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध राजस्थानकडून खेळताना एकाच षटकात ५ षटकार लगावले होते आणि राजस्थानला विजय मिळवून दिला होता.
त्याने या आयपीएल हंगामात १४ सामन्यात २५५ धावा केल्या होत्या आणि १० विकेट्स घेतल्या होत्या.
त्याने नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये हरियाणा संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने या स्पर्धेत ८२ धावा केल्या आणि २ विकेट्स घेतल्या.
राहुल तेवातियाची कारकिर्द –
राहुलने त्याच्या कारकिर्दीतल ७ प्रथम श्रेणी सामने खेळताना १९० धावा केल्या असून १७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने अ दर्जाचे २१ सामने खेळले असून ४८४ धावा केल्या असून २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ६८ ट्वेंटी-ट्वेंटी ९६५ धावा केल्या असून ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्ध दोन विजय अन् टीम इंडिया रचणार २१ व्या शतकातील ‘हा’ मोठा विक्रम
‘तू शेतकऱ्यांचा नायक आहेस’, क्रिकेटपटू संदीप शर्माचे होतेय कौतुक; ‘हे’ आहे कारण
चेपॉक स्टेडियमवर पहिल्यांदा इंग्लंडला कसोटीत धूळ चारणारा भारतीय धुरंधर, नाव आहे ‘पंकज रॉय’