---Advertisement---

सफल झाली सेवा! मोठ्या प्रतीक्षेनंतर घरच्या मैदानावर राहुल त्रिपाठीची स्वप्नपूर्ती

On: गुरूवार, जानेवारी 5, 2023 7:47 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघासाठी फलंदाज राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याने या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यासह मागील सहा महिन्यांपासून बेंचवरच बसण्याचा त्याचा प्रवास संपला.

https://twitter.com/BCCI/status/1610983369655083008?t=kWth3ISY26AXLGTG_CADrw&s=19

 

आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर यावर्षी जून महिन्यात झालेल्या आयर्लंड दौऱ्यावेळी राहुलचा प्रथमच भारतीय संघात समावेश केला गेला. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही तो संघाचा भाग होता.‌ त्यानंतर न्युझीलँड दौऱ्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले. मात्र, यावेळी त्याला पुन्हा संघात स्थान दिले गेले.

मुंबई येथील पहिल्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, असे होऊ शकले नाही. दुसऱ्या सामन्याआधी संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्याने राहुलला पदार्पणाची संधी मिळाली. विशेष म्हणजे राहुल महाराष्ट्रासाठी याच पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर देशांतर्गत क्रिकेट खेळत असतो. त्यामुळे घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा दुग्धशर्करा योग त्याच्या नशिबी आला. भारतासाठी टी20 क्रिकेट खेळणारा तो 102 वा क्रिकेटपटू ठरला. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या हातून त्याला ही कॅप देण्यात आली.

सध्या 31 वर्षांचा असलेला राहुल आत्तापर्यंत आपल्या कारकिर्दीत 125 टी20 सामने खेळला आहे. यात 2800 पेक्षा जास्त धावा त्याच्या नावे जमा आहेत. 2017 आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघासाठी खेळताना त्याने ओळख मिळवली होती. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठीही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याने आपल्या 76 आयपीएल सामन्यात 1778 धावा कुटल्या आहेत.

(Rahul Tripathi Debute For India In T20I In Pune)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे शिवम मावीने गाजवलं मुंबाईचं वानखडे स्टेडियम अन् दुसरीकडे घरी कुटुंबीय…
टीम इंडियाच्या ‘या’ दोन दिग्गजांना आयडल मानतो जितेश; म्हणाला, “त्यांनी मला…” 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---