भारतीय क्रिकेट संघाला आशिया चषक २०२२ पूर्वी झिम्बाब्वेचा दौरा करायचा आहे. गुरुवारीपासून (१८ ऑगस्ट) या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. हरारे क्रिकेट क्लब येथे होणारे हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.४५ ला खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यातून भारताचा नवखा खेळाडू राहुल त्रिपाठी याला पदार्पणाची संधी मिळू शकते.
३१ वर्षीय त्रिपाठीला (Rahul Tripathi) त्याच्या आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात (Team India) निवडले गेले होते. त्याला यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठीही जागा दिली गेली होती. परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवण्यात तो अयशस्वी ठरला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धही निवड झाल्यानंतरही तो भारतीय संघाकडून पदार्पण करू शकला नव्हता. परंतु आता वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्रिपाठीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, त्रिपाठी झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी उतरू शकतो. अशात सलामीला कर्णधार केएल राहुल आणि उपकर्णधार शिखर धवन उतरतील. जर त्रिपाठीला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचे झाल्यास, शुबमन गिलचा फलंदाजी क्रम बदलावा लागू शकते. गिल त्रिपाठीनंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
आयपीएलमधील प्रदर्शनामुळे आला निवडकर्त्यांच्या नजरेत
त्रिपाठी आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. त्याने मागील हंगामात १४ सामने खेळताना ३७.५५ च्या सरासरीने ४१३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतकेही निघाली होती. त्याच्या एकूण आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने ७६ सामने खेळताना १७९८ धावा केल्या आहेत.
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ३१ च्या सरासरीने फक्त १२०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ८ अर्धशतकेही केली आहेत. तसेच त्रिपाठीच्या नावावर ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचाही विक्रम आहे. स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळताना त्याने एकदा नव्हे दोनदा हा पराक्रम केला आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
सोलापूरचा महेंद्र पुन्हा चमकला! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पठ्ठ्याने मारले सिल्वर
आता आयपीएल उठवणार पीएसएलचा बाजार! आयसीसीनेच बनवला ‘प्रोग्राम’