आयपीएल २०२१ मध्ये रविवारी (१८ एप्रिल) पहिल्यांदा एका दिवशी दोन सामने खेळले जाणार आहे. यातील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात खेळला जात आहे. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सलामीला उतरलेल्या विराटचा राहुल त्रिपाठीने अप्रतिम झेल टिपत, आरसीबीला पहिला धक्का दिला.
आरसीबीचा फलंदाजीचा निर्णय
उभय संघातील या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. बेंगलोरने या सामन्यात आश्चर्यकारक निर्णय घेत केवळ तीन विदेशी खेळाडूंसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. डॅनिअल ख्रिस्टीयनला बाहेर करत युवा भारतीय फलंदाज रजत पाटीदारला पुन्हा संधी देण्यात आली. केकेआरने मागील सामन्यातील संघ कायम ठेवला.
अशा रितीने बाद झाला विराट
आरसीबीच्या डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने युवा फिरकीपटू वरून चक्रवर्तीला पाचारण केले. षटकातील दुसरा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न विराट कोहलीने केला. मात्र, चेंडू व्यवस्थित बॅटवर न आल्याने डीप पॉईंटच्या दिशेने उडाला. पॉईंट क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असलेल्या राहुल त्रिपाठीने वेगात मागे धावत जाऊन सूर मारत नेत्रदीपक झेल टिपला. त्याच्या या झेलाला अनेकांनी हंगामातील आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट झेल म्हणून संबोधले आहे. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/shoronjeet16/status/1383726720197427202?s=19
https://twitter.com/MSDianAbhiiii/status/1383731522151194631
आरसीबीने गाठला २०० धावांचा टप्पा
प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर आरसीबीची सुरवात काहीशी खराब झाली. सलामीला आलेला कर्णधार विराट कोहली दुसऱ्या षटकात ५ तर, युवा रजत पाटीदार त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर १ धाव काढून माघारी परतला. पण त्यांनतर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्सने वादळी खेळी केल्या. त्यामुळे आरसीबीली २०० धावांचा टप्पा पार करता आल्या. मॅक्सवेलने ४९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली. तसेच डिविलियर्स ३४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावांवर नाबाद राहिला.
या दोघांच्या अर्धशतकामुळे आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २०४ धावा केल्या आणि कोलकाताला २०५ धावांचे आव्हान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुझी आभारी आहे…,’ बड्डे बॉय केएल राहुलला गर्लफ्रेंड अथिया शेट्टीने दिल्या खास शुभेच्छा
मॉर्गनविरुद्ध गेल्या ८ सामन्यात पहिल्यांदाच विराटने जिंकला टॉस, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
चेन्नई-पंजाब सामन्यानंतर एमएस धोनीने दिला ‘हा’ सल्ला, शाहरुख खानने केला खुलासा