---Advertisement---

अटीतटीच्या लढतीत रायगड मराठा मार्वेल्स संघाची नंदुरबार हिमालयन ताहर्स संघावर मात

On: सोमवार, एप्रिल 17, 2023 5:44 PM
Kabaddi
---Advertisement---

नंदुरबार हिमालयन ताहर्स विरुद्ध रायगड मराठा मार्वेल्स यांच्यात रेलीगेशन फेरीतील सामना झाला. दोन्ही संघांनी सावध खेळ करत सामन्याला सुरुवात केली. पहिल्या 10 मिनिटात 7-7 असा सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर रायगड कडून रुतिक पाटीलने चढाईत गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली.

रायगड कडे 15-13 अशी मध्यांतरला आघाडी होती. नंतर मात्र नंदुरबारच्या चढाईत तेजस काळभोर व पकडीत तेजस राऊतच्या उत्कृष्ट खेळाने नंदुरबार संघाने आघाडी मिळवली. शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना 26-20 अशी नंदुरबार संघाकडे आघाडी होती. पण शेवटच्या पाच मिनिटात रायगड च्या रुतिक पाटीलच्या आक्रमक खेळाने रायगड संघाला आघाडी मिळवून दिली.

अत्यंत चुरशीची झालेली ही लढत रायगड संघाने 29-27 अशी जिंकली. रायगड संघाकडून रुतिक पाटील ने सर्वाधिक 11 गुण मिळवले. तर राज जंगम ने अष्टपैलू खेळ केला. तर अजय मोरे ने 3 पकडी केल्या. परभणी कडून तेजस काळभोर ने 8 गुण तर तेजस राऊत ने 7 पकडी केल्या. (Raigad Maratha Marvels beat Nandurbar Himalayan Tahers in a head-to-head match)

बेस्ट रेडर- रुतिक पाटील, रायगड मराठा मार्वेल्स
बेस्ट डिफेंडर्स- तेजस राऊत, नंदुरबार हिमालयन ताहर्स
कबड्डी का कमाल- तेजस काळभोर, नंदुरबार हिमालयन ताहर्स

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

पालघर काझीरंगा रहिनोसचा रेलीगेशन फेरीत तिसरा विजय
रेलीगेशन फेरीत रत्नागिरी अरावली ॲरोजचा तिसरा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---