---Advertisement---

MPL 2025 च्या अंतिम तयारीसाठी रायगड रॉयल्स ठाण्यात, ‘या’ निर्णयाचा होणार फायदा?

On: शुक्रवार, मे 30, 2025 10:05 PM
---Advertisement---

एमपीएल 2025 सुरू होण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी सर्वच संघ विजेतेपद पटकावण्यासाठी कंबर कसलेले दिसून येतात. पहिल्या दोन हंगामात फारसे यशस्वी न ठरलेल्या रायगड रॉयल्स (Raigad Royals) यांची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली दिसून येते. आपल्या तयारीचा अखेरचा भाग म्हणून‌ त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एमपीएल 2023 सोबतच मुंबई क्रिकेट असोसिएशनची मुंबई टी20 लीग देखील खेळली जाणार आहे. ही स्पर्धा मुंबईत पार पडेल. या स्पर्धेत मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स हा संघ सहभागी होत आहे. मराठा रॉयल्स व रायगड रॉयल्स या दोन्ही संघांची मालकी कपिल & सन्स यांच्याकडे असलेली दिसते. त्यामुळे आपापल्या लीग पूर्वी दोन्ही संघ एकत्र सराव करताना दिसतील. यासोबतच त्यांच्या दरम्यान सराव सामने देखील होणार आहेत.

सध्या दोन्ही संघ ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे सराव करताना दिसत आहेत. या दोन्ही संघांदरम्यान 31 मे व 1 जून रोजी सराव सामने होतील. त्यानंतर दोन्ही संघ आपापल्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. मराठा रॉयल्स संघात सिद्धेश लाड, तुषार देशपांडे, रोहन राजे व सक्षम पराशर असे नामांकित खेळाडू दिसून येतात. तर, या संघाला भारतीय संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे मार्गदर्शन करतात.

दुसरीकडे, पहिल्या हंगामात सोलापूर रॉयल्स तर दुसऱ्या हंगामापासून रायगड रॉयल्स असे नामकरण केलेल्या संघाला अद्याप यश मिळाले नाही. मात्र, तिसऱ्या हंगामासाठी त्यांनी हितेश वाळुंज व हर्ष मोगावीरा यांच्यासारखे मोठे खेळाडू संघात सामील करून घेतले आहेत. तर, कर्णधार ऋषभ राठोड, विकी ओस्तवाल, सिद्धेश वीर, तनय संघवी व स्वप्निल फुलपगार हे तिसऱ्या हंगामात आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील.

एमपीएल 2025 साठी रायगड रॉयल्सचा संपूर्ण संघ- विक्की ओत्सवाल (कर्णधार), सव्या गजराज, निखिल कदम, नदीम शेख, निमीर जोशी, शुभम कदम, अथर्व चौधरी, मोहम्मद अरकाम, ईशान लोहिया, श्रावण खाडे, ओमकार राजपूत, सिद्धेश वीर, तनय संघवी, रविंद्र जाधव, निरज जोशी, सागर जाधव, अभिषेक श्रीवास्तव, हितेश वाळुंज, चेतन कुरांदळे, नीरज मोरे, स्नेहल कामणकर, ऋषभ राठोड, वैभव आगम, अजय बोरुडे, दिग्विजय पाटील, स्वप्नील फुलपगार, ओमकार खाटपे, हर्ष संघवी, ऋग्वेद मोरे, हर्ष मोगावीरा, रणवीर चौहान, उत्कर्ष हजारे, रजनीकांत पडवळ, इब्राहिम वेलास्कर, हर्ष ओसवाल, अभिषेक ताटे, शर्विन किसवे, नचिकेत ठाकूर, ओमकार मोहिते व हृषीकेश राऊत

पहिल्या दोन हंगामाप्रमाणे एमपीएल 2025 ही पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे येथे खेळवली जाणार आहेत. यासंदर्भात एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, ज्यांना स्टेडियममध्ये जाता येणार नाही, त्यांच्यासाठी MPL 2025 मधील सर्व सामने JioHotstar’ या OTT अ‍ॅपवर तसेच ‘Star Sports 2’ वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. (MPL 2025 Live on Star Sports 2 and JioHotstar

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---