---Advertisement---

MPL 2025: रायगड राॅयल्स संघाचे MPLचे संपुर्ण वेळापत्रक…! पहा एका क्लिकवर

On: गुरूवार, मे 22, 2025 2:04 AM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीगचा अर्थात एमपीएलचा तिसरा हंगाम येत्या 4 जूनपासून सुरू होत आहे. देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक महाराष्ट्र प्रीमियर लीगचे हे तिसरे वर्ष आहे. यंदाच्या या हंगामात रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे 6 संघ जेतेपदासाठी भिडताना दिसतील. (MPL 2025: Maharashtra Premier League to Begin from 4th June)

या स्पर्धेतील शुभांरभ सामन्यातच गतविजेता संघ रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स (4 जून) रोजी आमने-सामने असतील. परंतु असे असले तरीही रायगड राॅयल्स संघावर सर्वांच्या नजरा असतील. विशांत मोरेच्या नेतृत्वाखाली संघातील खेळाडू यंदा जेतेपद जिंकण्यासाठी मैदानावर जिवाचं रान करताना दिसतील. स्पर्धेपूर्वी रायगडचे खेळाडू मैदानावर घाम गाळताना दिसत आहेत.

या तिसऱ्या हंगामात प्रत्येक संघ साखळी फेरीत 10 सामने खेळणार आहे. यावेळी रायगड राॅयल्सचा पहिला सामना (5 जून) रोजी होणार आहे. तर शेवटचा सामना (19 जून) रोजी होणार आहे. (MPL 2025: Full schedule of Raigad Royals for Maharashtra Premier League)

रायगड राॅयल्स संघाचे MPL 2025 चे संपूर्ण वेळापत्रक-

5 जून – विरुद्ध सातारा वॉरियर्स, दुपारी 2:00 वाजता
7 जून – विरुद्ध पुणेरी बप्पा, संध्याकाळी 7:00 वाजता
10 जून – विरुद्ध रत्नागिरी जेट्स, सकाळी 9:30 वाजता
12 जून – विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, संध्याकाळी 7:00 वाजता
13 जून – विरुद्ध पुणेरी बप्पा, सकाळी 9:30 वाजता
15 जून – विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, संध्याकाळी 7:00 वाजता
16 जून – विरुद्ध रत्नागिरी जेट्स, सकाळी 9:30 वाजता
17 जून – विरुद्ध सातारा वॉरियर्स, संध्याकाळी 7:00 वाजता
18 जून – विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, दुपारी 2:00 वाजता
19 जून – विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, सकाळी 9:30 वाजता

आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाहता येणार मोफत सामने
या स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित दादा पवार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सर्व प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

मोबाईलवरही पहा एमपीएलचे सामने
तसेच, हे सामने OTT प्लॅटफॉर्म ‘JioHotstar App’ तसेच ‘Star Sports2’ वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या देखील ही स्पर्धा अनुभवता येणार आहे. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioCinema)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---