पुणे (27 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजपासून रेलीगेशन फेरीला सुरुवात झाली. रेलीगेशन फेरीत अ व ब गटातील बॉटम 4 असे एकूण 8 संघ एकमेकांना लढत देणार आहेत. यातील दोन संघ प्ले-ऑफस साठी पात्र होणार आहेत. आज पहिला रेलीगेशन फेरीचा सामना रायगड विरुद्ध नाशिक यांच्यात झाला. सामन्याची सुरुवात अत्यंत संथ झाली होती. दोन्ही संघ विरुद्ध संघाला चुकीच्या पद्धतीने गुण देत नसल्याने संघर्ष पूर्ण लढत बघायला मिळाली.
नाशिक कडून शिवकुमार बोरगुडे चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवले तर रायगड कडून प्रशांत जाधव व धीरज बैलमारे यांनी गुण मिळवत सामन्यांत रंगत आणली होती. 12 मिनिटाच्या खेळानंतर सामना 8-8 असा बरोबरीत सुरू होता. मध्यंतराला नाशिक संघाने 19-16 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर रायगडच्या प्रशांत जाधव व धीरज बैलमारे यांनी आक्रमक चढाया करत गुण मिळवले. धीरज बैलमारे ने सुपर रेड करत रायगड संघाला 24-21 अशी आघाडी मिळवून दिली.
उत्ताधार्थ नाशिकच्या शिवकुमार बोरगुडे चांगला खेळ करत सामन्यात रंगत आणली होती. मात्र शेवटच्या काही मिनिट दोन्ही संघानी कोणत्याही धोका न पत्करता सामना बरोबरीत ठेवला. रेलीगेशन फेरीतील पहिलाच सामना 35-35 असा बरोबरीत राहिला. नाशिकच्या शिवकुमार बोरगुडे ने चढाईत सर्वाधिक 17 गुण मिळवले. तर बचवाफळीत गणेश गीते ने 5, जयेश पाटील ने 4 व शिवपरेश थोरे ने 3 गुण मिळवले. रायगड कडून प्रशांत जाधव व धीरज बैलमारे यांनी सुपर टेन पूर्ण केला. प्रशांत जाधव ने बचावफळीत सुद्धा महत्वपूर्ण 4 पकडीत गुण मिळवले. प्रणव इंदुलकर ने पकडीत 4 गुण मिळवले. (Raigad vs Nashik first match of relegation round draw)
बेस्ट रेडर- शिवकुमार बोरगुडे, नाशिक
बेस्ट डिफेंडर- गणेश गीते, नाशिक
कबड्डी का कमाल- शिवकुमार बोरगुडे, नाशिक
महत्वाच्या बातम्या –
विराट कोहली गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा क्रिकेटपटू, जाणून घ्या रोहित-धोनीचा क्रमांक कितवा?
“मुंबईत हार्दिक पांड्याविरोधात आणखी हूटिंग होईल”, माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केली भीती