मागील काही काळापासून सातत्याने भारतीय क्रिकेटपटू निवृत्त होत आहेत. रॉबिन उथप्पा, सुरेश रैना यांसारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांपासून ईश्वर पांडे आणि इतर प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंनीही क्रिकेटच्या मुख्य प्रवाहातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता आणखी एक नाव जोडले गेलेय. रेल्वेसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला तसेच आयपीएलमधून आपल्या वेगवान गोलंदाजीने नाव कमावलेला अनुरीत सिंग यानेदेखील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने आपला निर्णय सार्वजनिक केला.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये इंडिया ए, बडोदा, रेल्वे आणि सिक्कीमचे प्रतिनिधित्व केलेल्या अनुरीत सिंग याला आयपीएलमध्ये ओळख मिळाली होती. त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघासाठी आपला खेळ दाखवलेला. त्याने आयपीएलमध्ये आपला अखेरचा सामना राजस्थान रॉयल्ससाठी चार वर्षांपूर्वी खेळलेला. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 18 सामने खेळताना तितकेच बळी मिळवले होते. पंजाब किंग्ससाठी खेळताना त्याला विशेष ओळख मिळाली होती.
त्याने आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीत 72 प्रथमश्रेणी सामन्यात 249, 56 लिस्ट ए सामन्यात 85 व 71 टी20 सामन्यात 64 बळी मिळवले तो अखेरच्या वेळी सिक्कीमसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना दिसलेला.
https://www.instagram.com/p/Ci97K1FrsCH/?igshid=YmMyMTA2M2Y=
त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना म्हटले,
“मला लहानपणापासूनच क्रिकेटर व्हायचे होते. जेव्हा मी दिल्ली स्थित सुभानिया क्रिकेट क्लबमध्ये सामील झालो तेव्हा मी 16 वर्षांचा होतो. तेव्हापासूनचा हा एक अविश्वसनीय क्रिकेट प्रवास आहे. 2008 च्या देशांतर्गत हंगामात कर्नाटक विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात भारतीय रेल्वेकडून खेळण्याची संधी मिळाली तेव्हा हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते.”
त्याने आपले प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर, मुरली कार्तिक व अभय शर्मा यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. तसेच आपल्या संधी दिल्याबद्दल बीसीसीआय, विविध राज्य संघटना तसेच आयपीएल संघाचे देखील आभार मानले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला नुकसान! आयसीसी रँकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर
INDvsAUS: विराट-रोहितचे भन्नाट सेलेब्रेशन, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल
INDvsAUS: ‘किंग कोहली’ने पार केली ‘द वॉल’! फिफ्टी करताच केला ‘हा’ मोठा पराक्रम नावावर