हेडिंग्लेमध्ये इंग्लंड संघाची शानदार कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्या डावात 371 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. बेन डकेटने (Ben Duckket) शानदार फलंदाजी करत 119 धावा ठोकल्या. तर जॅक क्राउली (Jack Karavali) आणि जो रूट (Jo Root) यांनी देखील अर्धशतक झळकावले.
मालिकेतील दुसरा सामना आता एजबेस्टनमध्ये खेळला जाणार आहे. या मैदानावर आज पर्यंत भारतीय संघाला एकही विजय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत कर्णधार गिल (Captain Shubman gill) त्याच्या नेतृत्वाखाली काहीतरी नवीन बदल घडवण्याचा प्रयत्न करेल, तत्पूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट असण्याची दाट शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे (IND vs ENG 2nd Test Match). एक्यूवेदरच्या रिपोर्ट नुसार कसोटी सामन्याच्या पाचही दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पहिल्या चार दिवशी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण सामन्याच्या शेवटच्या दिवशी जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामानाचा अंदाज बघता दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते. कसोटी सामन्याच्या फक्त तिसऱ्या दिवशी ऊन पडू शकते.
टीम इंडियाचं (Team india) या मैदानावर रेकॉर्ड खूप खराब राहिलेलं आहे. एजबेस्टन मैदानावर टीम इंडिया आजपर्यंत एकही सामना जिंकू शकली नाही. विजय तर लांबच, पण टीम इंडियाने शेवटचा कसोटी सामना 1986 मध्ये ड्रॉ केला होता. या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्या 7 सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
म्हणजेच या मैदानावर विजय मिळवणे टीम इंडियासाठी स्वप्नासारखेच आहे. गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. 5 शतक झळकावल्यानंतरही टीम इंडिया हेडिंग्ले मैदानावर विजय मिळवू शकली नाही.






