---Advertisement---

प्ले ऑफपूर्वी चेन्नईला बसू शकतो मोठा धक्का; ‘हा’ स्टार फलंदाज होऊ शकतो स्पर्धेतून बाहेर

On: शुक्रवार, ऑक्टोबर 8, 2021 10:24 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) चौदाव्या हंगामात प्ले ऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ बनण्याचा मान एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने मिळवला होता. त्यानंतर मात्र अखेरच्या तीन साखळी सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. असे असले तरी, ते अजूनही पहिल्या दोन संघात राहून पहिल्या क्वालिफायर सामन्यात खेळू शकतात. परंतु, या सामन्यात संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज सुरेश रैना हा उपलब्ध असेल की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

रैनाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
आयपीएलच्या ११ हंगामात चेन्नईचे प्रतिनिधित्व केलेल्या रैनाला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते. तो या हंगामात तितकासा यशस्वी ठरला नसला तरी, त्याला सातत्याने संघात स्थान देण्यात येत होते. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या साखळी सामन्याआधी त्याला दुखापत झाल्याने तो या सामन्यात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर पंजाब विरुद्धही तो मैदानावर उतरला नाही. त्याच्या जागी रॉबिन उथप्पाला संघात संधी देण्यात आली.

प्रशिक्षकांची महत्वपूर्ण माहिती
चेन्नई संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी रैनाच्या दुखापतीविषयी बोलताना म्हटले, “खरे सांगायचे झाले तर, मलाही नक्की माहित नाही की तो कितपत तंदुरुस्त आहे. या बाबतीत मला पक्की माहिती मिळाली नाही. मात्र, तो लवकरात लवकर संघात सहभागी होईल अशी अपेक्षा आहे.”

माध्यमांतील वृत्तानुसार, चेन्नई क्वालिफायर १ साठी पात्र ठरली तर, कदाचित रैना या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. असे झाल्यास तो संघासाठी मोठा धक्का मानला जाईल.

आतापर्यंत अपयशी ठरला आहे रैना
चेन्नईचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या रैना या हंगामात पुरता अपयशी ठरला आहे. भारतात झालेल्या स्पर्धेच्या पूर्वार्धात तो केवळ एक अर्धशतक ठोकू शकला होता. त्यानंतर, युएई येथील स्पर्धेच्या उत्तरार्धात तो एकही मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला नाही. त्यानंतर, आता दुखापतीमुळे या हंगामातील त्याचे भविष्य अधांतरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हैद्राबादला ‘या’ धावांवर सर्वबाद केलं तर मुंबई जाणार प्ले-ऑफमध्ये

बड्डे आहे भावाचा..! चेन्नईच्या ताफ्यात ब्रावोचा वाढदिवस जल्लोषात साजरा, व्हिडिओ तूफान व्हायरल

प्लेऑफ आधी केकेआरसाठी आनंदाची बातमी, विस्फोटक फलंदाज खेळण्यासाठी फिट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---