अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात ५५ वा सामना होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफमधील प्रवेशसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद २३५ धावा केल्या आणि हैदराबादला २३६ धावांचे आव्हान दिले.
आता जर मुंबईने हैदराबादला ६५ धावांवर सर्वबाद केले, तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरेल. पण आता मुंबईच्या गोलंदाजांना अफलातून कामगिरी करावी लागणार आहे. आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी यापूर्वीच प्रवेश केला आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्समध्ये चूरस आहे.
सध्या कोलकाताचे साखळी फेरीतील सर्व १४ सामने खेळून झाले असून त्यांचे १४ गुण आहेत आणि ते +०.५८७ रनरेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता मुंबईलाही १४ गुण मिळवण्याती संधी आहे. जर मुंबईने हैदराबादविरुद्ध विजय मिळवला तर त्यांचे १४ गुण होतील, त्यामुळे प्लेऑफमधील चौथ्या क्रमांकासाठी नेटरनरेटचा विचार केला जाईल.
पण, कोलकाता नेटरनरेटच्या बाबतीत खूप पुढे आहे. त्याचमुळे जर मुंबईला कोलकाता संघाला नेटरनरेटच्या बाबतीत मागे टाकायचे असेल तर, त्यांना हैदराबादला ६५ धावांच्या आतच रोखावं लागेल, तरच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करणे शक्य होणार आहे.
मुंबईने या सामन्यापूर्वी आयपीएल २०२१ मध्ये १३ सामन्यांपैकी ६ सामने जिंकत १२ गुण मिळवले होते. त्यांचा – ०.०४८ रनरेट होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बड्डे आहे भावाचा..! चेन्नईच्या ताफ्यात ब्रावोचा वाढदिवस जल्लोषात साजरा, व्हिडिओ तूफान व्हायरल
झंझावाती ईशान! अबुधाबीच्या मैदानावर वादळ आणत रचला इतिहास
या ४ भारतीयांनी केले आहे भारताव्यतिरिक्त इंग्लंड आणि पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व






