भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. चाहत्यांसह सर्व क्रिकेटपटूही धोनीचा खूप आदर करतात. तर दुसरीकडे धोनी देखील आपल्या सहकारी खेळाडूंची देखील पूर्णपणे काळजी घेत असतो. त्याचबरोबर धोनीचे भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाशी खास नाते आहे. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे.
धोनी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार होता, तेव्हा त्याचे बर्याच खेळाडूंशी खास बॉन्डिंग असायचे, पण सुरेश रैनाशी त्याची जवळीक जास्त होती. अलीकडेच सुरेश रैनाने धोनीबरोबरचा एक जुना किस्सा एका मुलाखतीत शेअर केला होता. संकटाच्या वेळेस धोनीने त्याला कशा प्रकारे पाठिंबा दिला होता हे देखील त्याने सांगितले
रैनाच्या नेहमी संपर्कात होता धोनी
सुरेश रैनाने सांगितले की, जेव्हा 2007 मध्ये त्याला दुखापत झाली होती. तेव्हा धोनी नेहमी फोन करून त्याची विचारपूस करत होता. रैनाने एका चॅनेलशी बोलत असताना सांगितले की, 2007 च्या विश्वचषकामध्ये दुखापतीच्या कारणामुळे त्याला संघातून बाहेर जावे लागले होते. तेव्हा धोनी सतत त्याच्याशी संपर्क साधून त्याची विचारपूस करत होता. प्रत्येक दोन दिवसाला धोनी त्याच्या दुखापतीबद्दल विचारत असायचा.
शस्त्रक्रियेसाठी दिला नकार
रैनाने सांगितले की, जेव्हा त्याला दुखापत झाली होती तेव्हा धोनीने त्याला सांगितले की तू शस्त्रक्रियेसाठी अजून खूपच लहान आहेस. रैनाने सांगितले की, त्यावेळी धोनी कर्णधार देखील नव्हता, तरी ही तो दुखापतीबद्दल दररोज विचारत असायचा. त्याचबरोबर डॉक्टर काय म्हणाले आणि त्याच्यावर काय उपाय सांगितला आहे याची सर्व माहिती घेत होता. रैनाने सांगितले की, तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे दीड वर्ष भारतीय संघात खेळू शकला नव्हता.
मी परत खेळू शकेल का नाही शंका होती
त्याच बरोबर रैना पुढे म्हणाला की, भारतीय संघाचा सहकारी आणि भाऊ या नात्याने धोनी नेहमी त्याला समजून खूप उत्सुक होता. रैनाने सांगितले की, ‘धोनीमुळे खरोखरच प्रेरणा मिळाली की, मी लवकरच भारताचे प्रतिनिधित्व करेल.’ रैनाने सांगितले की, धोनीच्या प्रेरणेमुळे त्याला असे वाटले की त्याला त्याच्या खेळावर त्याचबरोबर गुडघ्यावर खूप परिश्रम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर रैना म्हणाला, ‘त्यावेळी मी पुन्हा कधी भारतकडून खेळू शकेन की नाही हे मला माहिती नव्हते.’
सोबतच घेतली निवृत्ती
महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांचे खास नाते आहे. धोनीने जेव्हा भारतीय संघात पदार्पण केले, त्यानंतर 8 महिन्यांनीच सुरेश रैनालाही संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. धोनी आणि रैनाने मिळून भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकले आहे. यानंतर या दोघांची मैत्री आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून एकत्र खेळताना अधिक बहरली. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली होती. यानंतर त्याचदिवशी सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा केवळ १० वर्षांचा खेळाडू झाला होता ऑलिम्पिकमध्ये सामील, आजही त्याच्याच नावावर आहे ‘हा’ विक्रम
अबब! १०० कोटींच्या क्लबमध्ये ‘या’ ५ धुरंधरांचा समावेश; जाणून घ्या कुणाची आहे किती कमाई?