सध्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये सर्व लोक सहभागी झालेले दिसत आहे. ज्यामधे भारतीय क्रिकेटपटू सुद्धा आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे. परंतु यामध्ये आता भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने दिलेल्या शुभेच्छा जास्त चर्चेत आहेत. त्याने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना भारतीय लष्कर दलातील सैन्याच्या व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामधे भारतीय लष्करातील सैन्य नवीन वर्षाचा आनंद साजरा करत आहेत.
भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना भारतीय लष्करातील सैन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामधे भारतीय सैन्य नवीन वर्षाच्या आनंदात नाचताना गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एएनआय या न्यूज एजन्सीने पोस्ट केला होता. तो व्हिडिओ रैनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
हा व्हिडिओ सुरेश रैनाने आपल्या ट्विटर अकाऊंट शेअर करताना लिहले आहे, “नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.” भारतीय लष्करातील सैन्य नवीन वर्षाचा आनंद नाचून गाऊन साजरा करत असलेला हा व्हिडिओ भरपूर लोकांना आवडला आहे. त्याचबरोबर बर्याच लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. त्याचबरोबर चाहते सुरेश रैनाला नवीन वर्षाच्या शुभेच्या देत आहे. तसेच काही जण त्याच्या आयपीएल मधील पुनरागमनाबद्दल विचारत आहेत. तर काही त्याच्या आयपीएल मध्ये खेळण्याची प्रतिक्षा करत आहेत.
🇮🇳🇮🇳👌happy new year ! #JaiHind 🙌 https://t.co/xbGEyVjfhd
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) January 1, 2021
परंतु सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच दिवशी त्याच्या अगोदर महेंद्र सिंग धोनीने सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. मात्र महेंद्र सिंग धोनी आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व केले होते. मात्र सुरेश रैना आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करू शकला नव्हता. तो आयपीएल खेळण्यासाठी यूएईत गेला होता. मात्र घरगुती कारणामुळे तो स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतात परतला.
सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय कामगिरी
सुरेश रैनाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना 18 कसोटी, 226 वनडे आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत. यामधे त्याने अनुक्रमे 768, 5615 आणि 1604 धावा केल्या आहेत. डावखुऱ्या हाताने शैलीदार फलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो.
महत्वाच्या बातम्या:
– खुशखबर! भारतातील क्रीडा सामन्यांना आता ५०% प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी
– युनिव्हर्सल बॉस घेणार निवृत्ती? खुद्द गेलनेच दिले हे उत्तर
– भारतीय खेळाडूंनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा; पाहा काही खास ट्विट