---Advertisement---

सुरेश रैनाच्या कुटुंबियांवर झाला हल्ला; एका नातेवाईकाचा झाला मृत्यू तर…

---Advertisement---

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल २०२० ला सुरुवात होणार आहे. पण आयपीएलला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख फलंदाज सुरेश रैना आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल२०२०मधून माघार घेतली आहे. त्याच्या या निर्णायानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे की पठाणकोट येथे त्याच्या आत्याच्या कुटुंबावर प्राणघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्याच्या आत्याच्या पतीचे निधन झाले आहे.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार पठाणकोटमधील थरियाग गावातील रैनाच्या नातेवाईकांवर मध्यरात्री हल्ला झाला. हा हल्ला १९ ऑगस्टच्या रात्री झाला, त्यावेळी कुटुंबातील सदस्य त्यांच्या घराच्या टेरेसवर झोपले होते. तेव्हा काही अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्रांसह हल्ला केला.

या हल्ल्यात रैनाची आत्या आशा देवी गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तसेच त्यांचे पती ५८ वर्षीय आशोक कुमार यांचे या हल्ल्यात निधन झाले. त्याचबरोबर रैनाचे आतेभाऊ कौशल कुमार आणि अपिन कुमार यांनाही दुखापत झाली आहे.

या हल्ल्याच्या कारणास्तव रैनाने आयपीएलमधून माघार घेतली असल्याचेही म्हटले जात आहे. पण अजून तरी रैनाने याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

त्याच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याबद्दल आज (२९ ऑगस्ट) सकाळी चेन्नई सुपर किंग्सने ट्विट करत माहिती दिली होती. या ट्विटमध्ये म्हटले होते की चेन्नई सुपर किंग्सचे सीइओ केएस विश्वनाथन यांनी सांगितले आहे की सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला असून तो या आयपीेएल हंगामासाठी उपलब्ध नसेल. चेन्नई सुपर किंग्स सुरेश रैनाला आणि त्याच्या कुटुंबाला या वेळेत पूर्ण पाठिंबा देईल.

आता चेन्नई सुपर किंग्ससमोर रैनाचा बदली खेळाडू शोधण्याचे मोठे आव्हान असेल; कारण रैना पहिल्या आयपीएल मोसमापासून चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा भाग राहिला आहेे. त्यातच चेन्नई सुपर किंग्समधील १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चेन्नई समोरील चिंता आणखी वाढल्या आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या १३ सदस्यांपैकी दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड हे २ खेळाडू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोरोना पाॅझिटिव्ह खेळाडू, रैनाची माघार व वाद यावर बीसीसीआय काय म्हणतेय पहा

टिंगल सुरु झाली तर! संकटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्जची मुंबई इंडियन्स घेतंय फिरकी?

चेंडूला स्विंग हवाय; मग वापरा पोट व पाठीचा घाम, या क्रिकेट बोर्डाने काढला अजब नियम

ट्रेंडिंग लेख –

एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा

परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात बीबीएलचे कर्णधार

१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---