पुणे, 10डिसेंबर 2022:पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या पीएमडीटीए-केपीआयटी- ओडीएमटी नटराज ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2022 स्पर्धेत मुलांच्या गटात राज दर्डा तर मुलींच्या गटात परी हेंगले यांनी मानांकीत खेळाडूंना पराभवाचा धक्का देत विजेतेपदाला गवसणी घातली.
ओडीएमटी नटराज टेनिस अकादमी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात दहाव्या मानांकीत राज दर्डाने अव्वल मानांकीत आरव गुप्ताचा 4-0, 0-4, 4-1 असा तर मुलींच्या गटात बिगर मानांकीत परी हेंगलेने अव्वल मानांकीत श्रेया होनकनचा 4-1, 4-0 असा एकतर्फी लढतीत पराभव करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुरेश भोईर, आकाश सुपेकर, अर्चित डहाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रणव वाघमारे उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
मुले- राज दर्डा(10) वि.वि आरव गुप्ता(1) 4-0, 0-4, 4-1
मुली- परी हेंगले वि.वि श्रेया होनकन(1) 4-1, 4-0
(Raj Darda, Pari Hengle win PMDTA-KPIT-ODMT Nataraj Bronze Series tennis tournament)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटनं थांबवलं नाहीतर…! द्विशतकानंतर इशान किशनने व्यक्त केली खंत
भले शाब्बास! सचिन- द्रविड अन् गांगुलीनंतर आता ईशान- विराट जोडीचं घेतलं जाणार नाव, कारणही तितकंच खास