---Advertisement---

अर्रर्र! दुसऱ्या क्वालिफायरआधीच राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, धाकड अष्टपैलूची स्पर्धेतून माघार

On: बुधवार, मे 25, 2022 9:08 PM
Rajasthan-Royals
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या चालू हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्सने जिंकला. राजस्थान रॉयल्सने या सामन्यात ७ विकेट्सने पराभव स्वीकारला. आता राजस्थानला अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यासाठी दुसरा क्वालिफायर सामना जिंकावा लागणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना २७ मे रोजी खेळला जाणार आहे आणि या सामन्याच्या आधी राजस्थानच्या एका अष्टपैलू खेळाडूने चालू आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे.

राजस्थान रॉयल्सला मोठा झटका
दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) खूपच महत्वाचा आहे, पण या सामन्याच्या आधी संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) आयपीएल २०२२ हंगामातून बाहेर झाला आहे. अशात हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात तो सहभागी होऊ शकणार नाहीये. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात लवकरच तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. याच कसोटी मालिकेत सहभागी होण्यासाठी डॅरिल मिचेल मायदेशात परतला आहे.

आयपीएलच्या चालू हंगामातील डॅरिल मिचेलचे प्रदर्शन पाहिले, तर ते काही खास राहिले नाहीये. त्याला संपूर्ण हंगामात फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या दोन सामन्यात त्याने १६.५० च्या सरासरीने ३३ धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात १६, तर दुसऱ्या सामन्यात १७ धावा असे त्याचे फलंदाजी प्रदर्शन राहिले आहे. गोलंदाजीत देखील तो पूर्णपणे अपयशी ठरताना दिसला. या दोन सामन्यात त्याने तब्बल १३.५०च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या आणि फक्त एक विकेट घेऊ शकला.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सकडे अंतिम सामन्यात जाण्यासाठी एक चांगली संधी होती, जी त्यांनी गमावली. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातने त्याला धूळ चारून अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. असे असले, तरी संघाकडे अजून एक संधी आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील जो संघ एलिमिनेटर सामना जिंकले, तो दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचणार आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये या दोन संघांपैकी एक संघ राजस्थान रॉयल्सशी भिडेल. क्वालिफायर दोनमध्ये जर राजस्थानने विजय मिळवला, तर त्यांचे अंतिम सामन्याचे तिकिट पक्के होईल. अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘आम्ही अजून आयपीएलमधून बाहेर गेलो नाही, आम्हाला…’, टेबल टॉपरविरुद्ध पराभूत झाल्यानंतर बटलरचं वक्तव्य

बटलरच्या वादळी खेळीने रचला जबरदस्त विक्रम; ठरला आयपीएलच्या इतिहासातील सातवाच फलंदाज

‘विराटची साथ मिळाली, तरच….’, LSG vs RCB सामन्यापूर्वी विरेंद्र सेहवागचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---