इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील चौथा सामना रविवारी (2 एप्रिल) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. मागील वर्षी अंतिम फेरीपर्यंत प्रवास केलेल्या राजस्थान रॉयल्सने या सामन्यात यजमान सनरायझर्स हैदराबादला डोके वर काढू दिले नाही. फलंदाजांनी मोठ्या धावा उभारल्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला 72 धावांनी विजय मिळवून दिला.
यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 203 धावा करत हैदराबादपुढे 204 धावांचे आव्हान ठेवले. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर जोस बटलर व यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने राजस्थानला 6 षटकात 85 धावांची सलामी दिली. दोघांनी प्रत्येकी 54 धावा केल्या. त्यानंतरच कर्णधार संजू सॅमसननेही अर्धशतक (55) पूर्ण केले. अखेरीस हेटमायर (नाबाद 22) याने काही आक्रमक फटके खेळत राजस्थानला 5 बाद 204 धावांचा टप्पा पार करून दिला. सनरायझर्ससाठी फारूखीने दोन बळी मिळवले.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला चांगल्या सुरुवातीची गरज होती. मात्र, त्यांना अशी सुरुवात करण्यात अपयश आले. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात एकही धाव न देता दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पावर प्लेमध्ये हैदराबादचे फलंदाज धावांची गती राखू शकले नाहीत. 52 धावांपर्यंत हैदराबादचे 6 फलंदाज तंबूत परतले होते. अब्दुल समद व आदिल रशीद यांनी थोडा वेळ झुंज दिली. मात्र, राजस्थानी पुन्हा एकदा सामन्यावर आपली पकड मिळवली. अखेरच्या दोन षटकात समद व उमरान मलिक यांनी काही मोठे फटके खेळत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. राजस्थानसाठी चहलने 4 बळी टिपले.
(Rajasthan Royals Beat Sunrisers Hyderabad By 72 Runs In IPL 2023 First Match Buttler Sanju Chahal Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर डेविड वॉर्नर नाखुश? पराभवानंतर काय म्हणाला पाहाच
सराव सामन्यात धोनीने ठोकला गगनचुंबी षटकार, पाहून सर्वांना झाली 2011 वर्ल्डकपची आठवण, पाहा व्हिडिओ
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट