---Advertisement---

“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत,” पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवानंतर संजू सॅमसन झाला भावूक

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 7:52 AM
---Advertisement---

सोमवारी (१२ एप्रिल) पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी विजय मिळवला आहे. आयपीएल हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच आठवड्यातील हा दुसरा असा सामना ठरला आहे, ज्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कोणालाच माहीत नव्हते की कुठला संघ जिंकणार आहे. या सामन्यात शतकी खेळी खेळणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनने सामना झाल्यानंतर आपले मत मांडले आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांच्या अर्धशतकी खेळीमुळे पंजाब संघाने ६ बाद २२१ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या राजस्थान संघाकडून संजू सॅमसनने एकहाती झुंज देत शतक झळकावले होते. शेवटच्या षटकात २ चेंडूवर ५ धावांची गरज असताना संजूने एक धाव घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर १ चेंडूमध्ये ५ धावांची गरज असताना तो झेलबाद झाला आणि हा सामना राजस्थान संघाने गमावला.

सामना झाल्यानंतर संजू म्हणाला, “माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीयेत. आम्ही सामना जिंकण्याच्या खूप जवळ होतो पण दुर्देवाने मी शॉट व्यवस्थित मारला असतानादेखील तो खेळाडूला पार करू शकला नाही. हा एक खेळाचा भाग आहे. आम्हाला वाटत होते की, खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होत आहे. पण पराभूत झालो असलो तरी मला वाटते की आम्ही चंगले खेळलो.”

पंजाब किंग्ज संघाने दिलेल्या २२२ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने एकहाती झुंज देत अवघ्या ६३ चेंडूत ११९ धावांची खेळी केली. यात १२ चौकार ७ षटकारांचा समावेश होता. याशिवाय जोस बटलरने २५, शिवम दुबेने २३ आणि रियान परागने २५ धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

बरोबर ६ वर्षांनी हुडाने केली तशीच अर्धशतकी खेळी, फरक फक्त एवढाच तेव्हा राजस्थानसाठी तर आता राजस्थानविरुद्ध

‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे आयपीएलमधील ‘षटकार किंग’, हा विक्रम पाहून विश्वास बसेल.

भारीच! २० चेंडूत अर्धशतक करणाऱ्या दीपक हुडाने ‘या’ विक्रमाच्या यादीत केली विरेंद्र सेहवाग, हार्दिक पंड्याची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---