गुरुवारी (१५ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला पहिला विजय साजरा केला. या विजयानंतर आनंदित झालेल्या राजस्थान संघातील खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन केले. त्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ राजस्थान रॉयल्सच्या अधिक्रुत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर करण्यात आला आहे.
राजस्थानच्या खेळाडूंनी केले सेलिब्रेशन
हंगामातील पहिल्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. अखेरच्या दोन षटकांत ३० धावांची गरज असताना अष्टपैलू ख्रिस मॉरिसने चार षटकार ठोकत राजस्थानला विजयी केले. या विजयानंतर, राजस्थानच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये आनंद साजरा केला. त्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये युवा अष्टपैलू रियान पराग हा एका गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्याच्यासोबत या व्हिडिओमध्ये अनुज रावत, मनन वोहरा, लियाम लिव्हींगस्टोन व ख्रिस मॉरिस दिसून येत आहेत. व्हिडिओच्या अखेरीस युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाही ताल धरताना दिसतोय. या व्हिडिओला ‘मूड ऑल गुड’ असे कॅप्शन दिले गेले आहे.
https://www.instagram.com/p/CNsqOkknOgB/
राजस्थानचा रोमहर्षक विजय
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात १४७ धावा काढल्या. राजस्थानसाठी जयदेव उनाडकतने सर्वाधिक ३ बळी मिळविले.
प्रत्युत्तरात, डेव्हिड मिलर (६२) व ख्रिस मॉरिस (नाबाद ३६) यांच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर राजस्थानने हे आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केले. जयदेव उनाडकत सामन्याचा मानकरी ठरला. राजस्थानचा हा स्पर्धेतील पहिला विजय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणाने धोनीवर निलंबनाची टांगती तलवार, एका सामन्यातून होऊ शकतो बाहेर
ए आर रहमान यांनी एमएस धोनी आणि सुरेश रैना ‘ही’ गाणी केली समर्पित, कारणही सांगितले
‘या’ खेळाडूला आगामी सामन्यांमध्ये मिळणार नाही हैदराबाद संघात जागा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी





