इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. आयपीएल 2023 मधील उद्घाटनाचा सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान 31 मार्च रोजी खेळला जाईल. त्याचवेळी मागील वर्षी अंतिम फेरीपर्यंत प्रवास केलेल्या राजस्थान रॉयल संघाला वेळापत्रक जाहीर होताच मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा प्रमुख वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा संपूर्ण आयपीएल हंगामातूनच बाहेर झाला. राजस्थानने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.
भारतीय वनडे संघातील गोलंदाजांपैकी एक असलेला कृष्णा हा मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाला होता. त्याला पाठीची दुखापत झालेली. तेव्हापासून तो कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. गुरुवारी (16 फेब्रुवारी) त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो आता जवळपास सहा महिने कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सने एक निवेदन प्रकाशित करत ही माहिती दिली.
प्रसिद्ध कृष्णा हा मागील हंगामात प्रथमच राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळताना दिसला होता. राजस्थानने त्याच्यावर 10 कोटींची मोठी बोली लावलेली. त्याने या हंगामात राजस्थानसाठी उत्कृष्ट कामगिरी करताना 17 सामने खेळताना 19 बळी आपल्या नावे केले होते. कृष्णा बाहेर झाल्याने राजस्थानच्या वेगवान गोलंदाजीची धुरा आता न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, ओबेद मेकॉय व कुलदीप सेन यांच्याकडे असेल.
आयपीएल 2023 मध्ये राजस्थान आपल्या मोहिमेची सुरुवात सनरायझर्स हैदराबादविरूद्ध 2 एप्रिल रोजी करेल. या हंगामात पुन्हा एकदा राजस्थान मागील वर्षी प्रमाणे अंतिम फेरीत पोहोचण्याचा तसेच आपले दुसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. या हंगामात देखील संजू सॅमसन यांच्याच खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा असेल.
(Rajasthan Royals Confirm Prasiddh Krishna Ruled Out From IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादला मिळाला कर्णधार? मयंक अन् भुवी नाही, तर अश्विनने ‘या’ खेळाडूचं घेतलं नाव
BREAKING: 31 मार्चपासून उडणार आयपीएल 2023 चा धुरळा, सीएसके-गुजरातमध्ये रंगणार उद्घाटनाचा सामना