भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २६ डिसेंबरपासून खेळला जाईल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा आठ गडी राखून पराभव केला आहे. कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्याने आणि पहिला कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेत भारताचा मार्ग कठीण मानला जातोय. याशिवाय मेलबर्नच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथपासूनही सावध रहावे लागेल. नुकताचे आयसीसीने स्मिथच्या मेलबर्न मैदानावरील आकडेवारी बाबतचे एक ट्वीट केले. त्यावर आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली.
स्मिथने मेलबर्नमध्ये केली आहे दमदार कामगिरी
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर स्टीव स्मिथने आतापर्यंत सात सामन्यांत ११३.५ च्या सरासरीने ९०८ धावा केल्या आहेत. यात स्मिथने चार शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. स्मिथने देखील अनेकदा कबूल केले आहे की, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड त्याचे आवडते मैदान आहे.
आयसीसीने केले ट्विट
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्मिथच्या आकडेवारीसह ट्विट केले की,
‘बॉक्सिंग डे कसोटीत स्टार ऑस्ट्रेलियन फलंदाजाला या मैदानावर अधिक यश मिळेल का?’
Steve Smith at the MCG:
👕 Seven matches
🤯 908 runs at 113.5
4️⃣ centuries, 3️⃣ fiftiesWill the star 🇦🇺 batsman taste more success at the venue in the #AUSvIND Boxing Day Test? pic.twitter.com/oq1KdAVbir
— ICC (@ICC) December 21, 2020
राजस्थान रॉयल्सने आयसीसीच्या ट्विटवर मजेदार प्रत्युत्तर दिले. राजस्थान रॉयल्सने लिहिले की, ‘या गोष्टीवर आनंद व्हावा की दु:ख करावे हे माहित नाही.’
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) December 22, 2020
स्टीव स्मिथ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करतो.
भारताविरुद्ध स्मिथने ठोकले होते पहिले कसोटी शतक
मेलबर्नमध्ये स्टीव्ह स्मिथने भारतीय संघाविरुद्धच आपले पहिले शतक झळकावले होते. २०१४ च्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याने १९२ धावा केल्या. मात्र, या कसोटीत विराट कोहलीच्या १६९ आणि ५४ धावांच्या खेळीमुळे भारताने हा सामना अनिर्णित राखला. स्मिथने या मैदानावर भारताव्यतिरिक्त वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध शतके केली आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यातही स्मिथकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्वाच्या बातम्या:
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
– बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करायची आहे, तर असा सराव करा
– बॉक्सिंग डे कसोटी! पाहा काय आहे भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास