इंडियन प्रीमियर लीग २०२२, ही जगातील सर्वात मोठी लीग २६ मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये पार पडणार आहे. यापुर्वी राजस्थान राॅयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि संघ व्यवस्थापणामध्ये खटके उडाल्याचे दिसत आहे. राजस्थान राॅयल्स संघाच्या ट्वीटर आकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला संजू सॅमसनचा एक फोटो याला कारणीभूत ठरला आहे. यानंतर संजू सॅमसनने राजस्थान फ्रॅंचायझीच्या ट्वीटर आकाऊंटला अनफाॅलो केले आहे. यानंतर आता संघाने एक ट्वीट करत याबद्दल सर्व माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
शुक्रवारी (२५ मार्च) दुपारी राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसनचा एक मजेदार फोटो पोस्ट केला, जो संजू सॅमसनला अजिबात आवडला नाही. कॅप्शनमध्ये संघाने लिहले की, ‘क्या खुब लगते हो.’ ज्यामध्ये संघाचा कर्णधार संजू सॅमसनचा बसमधील एक विनोदी फोटो होता. हा फोटो पाहिल्यानंतर संजू सॅमसनने संंघ व्यवस्थापणाला चांगलेच सुनावले आहे.
या पोस्टला उत्तर देताना संजू सॅमसनने लिहिले की, ‘संघातील खेळाडूंनी असे विनोद केले तर ठीक. परंतु संघ व्यवस्थापणाने प्रोफेशनल राहिले पाहिजे.’ त्यानंतर संघ व्यवस्थापणाने हा फोटो आपल्या ट्वीटर आकाऊंट वरुन हटवला आहे. तर संजू सॅमसनने फ्रॅंचायझीचे ट्वीटर आकाऊंट अनफाॅलो केले आहे.
Rajasthan Royals deleted the tweet after Sanju’s response.
Sanju has also unfollowed RR on Twitter. pic.twitter.com/M7SPPLvucR
— Johns. (@CricCrazyJohns) March 25, 2022
Offical statement from the royals management team.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 25, 2022
https://t.co/bDwj0V6Vms pic.twitter.com/tXfaLpoOxl
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 25, 2022
या ट्विटच्या काही तासांनंतर, राजस्थान रॉयल्सने त्यांच्या वतीने एक अधिकृत निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, “शुक्रवारी (२५ मार्च) घडलेल्या घटनेनंतर नवीन सोशल मीडिया टीम नियुक्त केली जाईल आणि ते त्यांच्या सोशल मीडिया रणनीतीमध्ये बदल देखील करतील. संघात सर्व काही ठीक असून सनरायझर्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी संघ सज्ज आहे. व्यवस्थापन आमच्या संपूर्ण डिजिटल रणनीतीला पुन्हा भेट देईल आणि एक नवीन टीम नियुक्त केली जाईल. आम्हाला माहित आहे की हा आयपीएल हंगाम आहे आणि आम्हाला समजले आहे की चाहत्यांसाठी आकाऊंटवरुन पोस्ट नियमितपणे पोस्ट केल्या पाहिजेत. आम्ही तात्पुरता उपाय शोधत आहोत.” राजस्थान राॅयल्स संघ आपला पहिला सामना हैद्राबाद संघासोबत खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! २०२३मध्ये होणार ‘महिला आयपीएल’, ६ संघांमध्ये स्पर्धा घेण्याचे बीसीसीआयचे नियोजन
ऑस्ट्रेलियाने ‘करुन दाखवलं’, पाकिस्तानला त्यांच्याच मातीत लोळवलं; कसोटी मालिका १-० जिंकली
धोनीने सीएसकेची कॅप्टन्सी सोडल्यानंतर व्हायरल होतोय ‘हा’ जुना व्हिडिओ, पाहा काय म्हणालाय ‘थाला’