आयपीएलच्या पहिल्याच सत्रात विजेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला २००८ नंतर एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले नाही. आता आयपीएल २०२१ साठी श्रीलंकन संघाचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा याला राजस्थान रॉयल्स संघाचे डायरेक्टरपद देण्यात आले आहे. तसेच ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच त्याने मोठा निर्णय घेतला आहे.
आयपीएल २०१९ च्या हंगामात एंड्रयू मॅक्डोनाल्ड यांना राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका देण्यात आली होती. या पदासाठी राजस्थान रॉयल्स संघाने अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांच्यासोबत ३ वर्षांचा करार केला होता. परंतु, आता २ वर्षांनतर त्यांना या पदावरून काढून टाकण्यात आले आहे.
आयपीएल २०२० स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ ८ व्या क्रमांकावर होता. याच कारणास्तव अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. साल २०१८ च्या आयपीएल सत्रात राजस्थान रॉयल्स संघात मुख्य प्रशिक्षक नसताना देखील संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला होता.
अँड्र्यू मॅक्डोनाल्ड सध्या टी -२० मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत. तसेच १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या आयपीएल लिलावात देखील अँड्र्यू मॅक्डोनाल्ड उपलब्ध नव्हते. राजस्थान रॉयल्स संघाने अँड्र्यू मॅक्डोनाल्ड यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच कुमार संगकारा संघाच्या डायरेक्टर पदासोबतच मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावू शकतात. यासोबतच त्यांना श्रीलंका संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेवर मदत यांची मदत मिळू शकते. तसेच प्रशिक्षक स्टाफमध्ये जुबिन भरुचा( डेवलपमेंट आणि परफॉर्मेंस डायरेक्टर), साईराज बहुतुले( फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक), रॉब कैसेल( जलद गोलंदाजी प्रशिक्षक) आणि दिशांग याग्निक (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) यांची देखील मदत मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियात निवड होताच सुर्यकुमारची तुफानी खेळी; मुंबईला मिळवून दिला विजय
‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाची धमाकेदार फलंदाजी! ‘या’ स्पर्धेत ७ षटकारांसह केली शतकी खेळी
चौदा कोटी मिळवणाऱ्या रिचर्डसनची लिलावावेळी झाली होती ‘अशी’ अवस्था, स्वतः केला खुलासा