गुरुवारी (दि. १४ एप्रिल) आयपीएल २०२२मधील २४वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे पार पडणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी ७ वाजता उभय संघात नाणेफेक झाली. यावेळी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यात राजस्थान (Rajasthan Royals) संघ एक बदलासह मैदानात उतरणार आहे. ट्रेंट बोल्टच्या जागी जिम्मी निशामची एन्ट्री झालीये. दुसरीकडे, गुजरात (Gujarat Titans) संघाकडून यश दयाल पदार्पण करत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यंदाच्या हंगामातील कामगिरी
राजस्थान रॉयल्स संघाने या हंगामात ४ सामने खेळले आहेत. यात त्यांनी ३ सामन्यात विजय मिळवला आहे, तर १ सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे, गुजरात संघानेही ४ सामने खेळताना ३ सामन्यात विजय आणि १ सामन्यात पराभव पत्करला आहे. गुणतालिकेत राजस्थान संघ ६ गुणांसह अव्वलस्थानी आहे, तर गुजरात संघ पाचव्या स्थानी आहे.
#RR have won the toss and they will bowl first against #GujaratTitans
Live – https://t.co/yM9yMibDVf #RRvGT #TATAIPL pic.twitter.com/TE0Udrg0ZO
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2022
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन-जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, रियान पराग, जिम्मी नीशम, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन- मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी आणि यश दयाल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामन्यानंतर कर्णधार मयंक अगरवालला फलंदाजी टिप्स देताना दिसला सचिन तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल