क्रिकेटजगतात ‘यॉर्कर किंग’ नावाने विख्यात असलेला जसप्रीत बुमराह सोमवारी (१५ मार्च) लग्नबंधनात अडकला आहे. पेशाने स्पोर्ट अँकर असलेल्या संजना गणेशन हिच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. गोव्यात या दोघांनी लग्न केले असून दोघांनीही याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. यानंतर सोशल मीडियावर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघानी दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
‘तुम्हा दोघांनाही लग्नाच्या खूप शुभेच्छा, आम्ही ऐकलंय की एप्रिल-मे महिन्यात मालदीव हे अप्रतिम ठिकाण असते,’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
अर्थात त्यांनी बुमराहला अप्रत्यक्षपणे सुचवले आहे की, लग्नानंतर त्याने संजनाला हनीमूनसाठी मालदीवला घेऊन घ्यावे जावे. कारण एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. अशावेळी मालदीवसारख्या समुद्र असणाऱ्या ठिकाणी फिरायला जाणे, सर्वांनाच आवडते.
Congratulations, guys! ????
We hear Maldives is great in April – May ???? https://t.co/K3cBgz6cBS
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 15, 2021
संजना गणेशनबद्दल थोडसं…
बुमराहची पत्नी संजना ही स्पोर्ट अँकरबरोबर मॉडेलही आहे. तसेच ती आयपीएल स्पर्धेत प्रेसेंटर म्हणून कार्यरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात देखील ती होस्ट म्हणून पाहायला मिळाली होती. क्रिकेटव्यतिरिक्त ती बॅडमिंटन आणि फुटबॉल स्पर्धेत अँकर म्हणून दिसून येते.
संजनाने पुण्यातून शिक्षण घेतले आहे. तिने इंजीनिअरिंग केले असून पुण्यातील सिंबायोसिस इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये ती शिकली आहे. तिचे वडिल हे ‘अलाना इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’ या संस्थेत डायरेक्टर म्हणून काम पाहतात. संजनाने रिऍलिटी शो रोडीजमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्येही नशीब आजमावलं होतं. २०१४ साली ती मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. तिने २०१३ साली फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार देखील जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मै तेरा, मै तेरा..! लग्नानंतर बुमराह-संजनाचा जुना व्हिडिओ व्हायरल, लाजताना दिसतोय जस्सी
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराह चढला बोहल्यावर, लग्नातील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ






