आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यामुळे राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण देण्यात आले. राजस्थानचा अनुभवी सलामीवीर जोस बटलर याने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत पुन्हा एकदा राजस्थानच्या धावसंख्येत मोठे योगदान दिले. त्याचवेळी बटलरने या खेळीदरम्यान आपल्या आयपीएल कारकिर्दीतील एक मैलाचा दगड देखील पार केला.
यापूर्वी हंगामात दोन अर्धशतके ठोकलेल्या बटलर याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. सुरुवात संथ केल्यानंतर त्याने तिसऱ्या षटकापासून आक्रमण केले. त्यानंतर चौकार षटकार लगावत संघाची धावसंख्या पुढे नेली. त्याने मोईन अलीच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी 1 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 36 चेंडूवर 52 धावा केल्या.
या अर्धशतकी खेळी दरम्यान बटलर याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 3000 धावांचा टप्पा पार केला. त्याने आपल्या 86 व्या आयपीएल सामन्यातील 85 व्या डावात ही कामगिरी करून दाखवली. त्याच्या या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत 22 अर्धशतक व 5 शतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 3000 धावा करण्याचा पराक्रम ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने केवळ 75 डावांमध्ये हा टप्पा पार केलेला. त्यानंतर केएल राहुल याने 80 डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली होती. त्यानंतर आता बटलर याचा क्रमांक लागतो. या यादीमध्ये चौथ्या स्थानी संयुक्तपणे डेव्हिड वॉर्नर व फाफ डू प्लेसिस आहेत. या दोघांनी 94 डावांत 3000 धावा केल्या होत्या.
(Rajasthan Royals Jos Buttler Complete 3000 IPL Runs In 85 Innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाशिक द्वारका डिफेंडर्सचा सलग तिसरा विजय
अटीतटीच्या लढतीत परभणी संघाचा विजय तरीही टॉप 4 मधून बाहेर