---Advertisement---

राजस्थान रॉयल्ससाठी खुशखबर! आर्चरच्या हाताची झाली सर्जरी, आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची शक्यता

On: मंगळवार, मार्च 30, 2021 10:10 AM
Jofra Archer
---Advertisement---

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडच्या भारत दौऱ्याचा प्रारंभ झाला होता. या दौऱ्यातील शेवटची वनडे मालिका सुरु होण्यापुर्वी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या रुपात इंग्लंडला मोठा धक्का बसला होता. दुखापतीमुळे त्याने या मालिकेतून घेतली होती. याच सबबामुळे त्याचे येत्या आयपीएल २०२१ मध्ये खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. अशात आर्चरच्या दुखापतीविषयी मोठी माहिती पुढे आली आहे.

सोमवार रोजी (२९ मार्च) आर्चरने त्याच्या हाताच्या बोटाची शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटात काचेचा तुकडा सापडला आहे. त्यामुळे त्याच्या आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याबाबतचा अंतिम निर्णय या आठवड्याच्या शेवटपर्यंत घेतला जाईल.

इंग्लंड क्रिकेटचे संचालक ऍश्ले जाइल्स यांनी बीबीसीच्या एका कार्यक्रमात आर्चरच्या दुखापती संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “आर्चर घरी साफसफाई करत असताना त्याच्या हातावर मास्यांचा टॅंक पडला होता. त्यामुळे त्याचा हात कापला गेला होता. तरीही त्याने भारताविरुद्ध क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुखापतीचा त्रास वाढू लागल्याने त्याने वनडे मालिकेतून माघार घ्यायचे ठरवले होते.”

“त्यानंतर आर्चरने आपल्या दुखापतीचा आढावा घेण्यासाठी तज्ञांची भेट घेतली. यावेळी डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. ही शस्त्रक्रिया आता यशस्वीरित्या पार पडली असून त्याच्या उजव्या हाताच्या बोटात काचेचा तुकडा सापडला आहे. आता तो दुखापतीतून लवकरात लवकर बरे होवो,” असे जाइल्स यांनी शेवटी सांगितले.

आर्चर हा आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या अनुपस्थिमुळे राजस्थानची चिंता वाढली आहे. परंतु शस्त्रक्रियेनंतर आर्चर दुखापतीतून लवकर सावरल्यास तो आयपीएल २०२१ मध्ये खेळताना दिसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

माही भाई काहीही करु शकतो..! हार्दिकच्या ‘त्या’ प्रश्नावर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया

“रिषभ पंतविना भारतीय संघाची कल्पनाच करु शकत नाही,” इंग्लिश दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका गाजवणारा ‘हा’ भारतीय गोलंदाज, आता मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळण्यास सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---