आयपीएलने अनेक खेळाडूंना आपले आयुष्य घडविण्याची संधी दिली आहे. आयपीएलमध्ये अनेक भारतीय युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंवर भारी पडले आहेत. आयपीएलमुळे बरेचसे युवा शिलेदार त्यांच्या आदर्श खेळाडूविरुद्धही मैदानात उरताना दिसतात. राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आणि त्याचा आदर्श चेन्नई सुपर किंग्जचा एमएस धोनी, यांच्याबाबततही असेच घडले आहे.
आता राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने धोनी आणि त्याचा चाहता रियान यांच्या एका जुन्या आठवणीला उजाळा दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत धोनीच्या गळ्याभोवती आसामचा पारंपारिक स्कार्फ दिसत आहे. तर एक लहान मुलगा त्याच्याबरोबर उभा आहे. तो मुलगा राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रियान आहे. या फोटोला फ्रँचायझीने कॅप्शन देत लिहिले की, ‘आपण शिकतो आणि पुढे जातो.’
माध्यमांतील वृत्तांनुसार, रियान आणि धोनीचा हा फोटो रियान 6 वर्षांचा होता तेव्हाचा आहे. तर दुसरा फोटो २०१९ मध्ये रियानच्या आयपीएल पदार्पणावेळीचा आहे. त्यावेळी त्याने आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला होता. या सामन्यात रियान 16 धावा करुन बाद झाला होता. सामन्यानंतर रियानने धोनीची भेट घेत त्याच्यासोबत फोटो काढला होता.
या फोटोविषयी रियानला विचारले गेले होता, तेव्हा त्याने सांगितले की, “मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच धोनीचा मोठा चाहता आहे. मी 6 किंवा 7 वर्षांचा होतो तेव्हा हा फोटो काढला होता.”
पराग धोनीला लहानपणापासूनच आपला आदर्श मानतो
याबरोबरच रियानने सांगितले की, “मी सहा किंवा सात वर्षांचा होतो तेव्हापासून मी धोनीला माझा आदर्श मानतो. आता मला त्याच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळत आहे. मी त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करीत आहे. त्याच्याविरुद्ध क्षेत्ररक्षणालाही उभारत आहे. हा खरोखर खास अनुभव आहे.”
धोनीसोबतच्या पहिल्या मुलाखतीनंतरच्या 16 वर्षांत, रियानने एक लांब पल्ला गाठला आहे. 2018 मध्ये अंडर 19 विश्वचषक जिंकणार्या संघाचा तो सदस्य होता. या विश्वचषकानंतर राजस्थान रॉयल्सने 2019 च्या आयपीएलच्या लिलावात 20 लाख रुपयांना विकत घेतले. रियानचे वडील पराग दाससुद्धा आसामकडून क्रिकेट खेळले आहेत.
"You evolve, you learn, you grow." 😍 pic.twitter.com/Kdc14oC7K7
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 9, 2021
रियानचे वडील आणि धोनी एकत्र खेळले आहेत
विशेष म्हणजे रियान परागचे वडील आणि धोनी देखील एकत्र घरगुती क्रिकेट खेळले आहेत. वास्तविक, धोनीने सन 2000 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला तो बिहारकडून खेळायचा. त्याचवर्षी त्याने रियानचे वडील पराग दास यांना आसामविरूद्ध रणजी करंडक सामन्यात स्टंपआऊट केले. त्यावेळी रियानचा जन्मही झाला नव्हता. इतकेच नव्हे तर पराग दास आणि धोनी हे दोघे एकाच रेल्वे संघाकडून क्रिकेट खेळले आहेत.
रियानने आतापर्यंत राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमधील 26 सामन्यात 324 धावा केल्या आहेत. त्याने एक अर्धशतकही केले आहे. आयपीएल 2021 पुढे ढकलण्यापूर्वी रियानने 7 सामन्यांत 78 धावा केल्या आणि एक विकेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
विश्वचषकात ‘तू चल मी आलो’चा प्रसंग, इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या ४५ धावांवर गुंडाळला होता डाव
ब्रॉडने निवडली त्याची ‘ऑलटाईम फेवरेट इलेव्हन’, सचिनसह त्याच्या जिगरी मित्रालाही दिली जागा
‘इंग्लंडला गुंडाळलं, आता भारताचा नंबर,’ न्यूझीलंडच्या दणदणीत विजयानंतर दिग्गजाचा दावा