राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात केली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 200 धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा राजस्थान आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला संघ ठरला. यामध्ये राजस्थानच्या 3 खेळाडूंच्या अर्धशतकांचा समावेश होता. आता हैदराबाद संघ या आव्हानाचा पाठलाग यशस्वीरीत्या करतो की नाही, हे पाहणे रंजक ठरेल.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunriser Hyderabad) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 203 धावा करत हैदराबादपुढे 204 धावांचे आव्हान ठेवले.
Alright, 204 to defend. Thoughts? 😁
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 2, 2023
राजस्थानकडून यावेळी 3 खेळाडूंनी अर्धशतक झळकावले. त्यात कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या सर्वाधिक धावांचा समावेश होता. त्याने 32 चेंडूत 55 धावा केल्या. त्यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर (Jos Buttler) यांच्या नावाचा समावेश आहे. जयस्वालने सामन्यात 37 चेंडूत 9 चौकारांसह 54 धावा केल्या. तसेच, बटलरनेही 22 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त शिमरॉन हेटमायर यालाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्याने यावेळी 16 चेंडूत नाबाद 22 धावा चोपल्या. यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.
यावेळी सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजी करताना दोन गोलंदाजांनी दोन विकेट्स घेतल्या. त्यात फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांचा समावेश होता. फारुकीने 4 षटके गोलंदाजी करताना 41 धावा करताना 2 विकेट्स घेतल्या. तसेच, नटराजनने 3 षटके गोलंदाजी करताना 23 धावा देत 2 विकेट्स नावावर केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त उमरान मलिक यानेही 1 विकेट नावावर केली.
आता सनरायझर्स हैदराबाद संघ हे आव्हान पार करण्यात यशस्वी ठरतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Rajasthan Royals score 203 Runs against Sunrisers Hyderabad in ipl 2023 4th match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर डेविड वॉर्नर नाखुश? पराभवानंतर काय म्हणाला पाहाच
सराव सामन्यात धोनीने ठोकला गगनचुंबी षटकार, पाहून सर्वांना झाली 2011 वर्ल्डकपची आठवण, पाहा व्हिडिओ
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट