जगातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) पंधरावा हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. २६ मार्चपासून मुंबई आणि पुणे येथे ४ मैदानांवर ही स्पर्धा खेळली जाईल. तत्पूर्वी, सर्व संघांनी याची तयारी सुरू केली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने सुरत (CSK Camp In Surat) येथे २० दिवसांच्या मोठ्या सराव शिबिराचे आयोजन केले आहे. तर, स्पर्धेत प्रथमच सहभागी होत असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचे पहिले सराव शिबिर नुकतेच समाप्त झाले.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात विजेतेपद मिळविल्यानंतर त्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी तयारीत असलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघानेदेखील काही देशांतर्गत खेळाडूंसह पहिल्या सराव शिबिरास नागपूर येथे सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून याबाबत माहिती दिली. (Rajasthan Royals Training Camp)
https://www.instagram.com/p/Ca2QNv0MWlx/?utm_medium=copy_link
राजस्थान रॉयल्स संघाचे हे सराव शिबिर गोलंदाजी प्रशिक्षक स्टीफन जोन्स (Steffen Jones) व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक (Dishant Yagnik) यांच्या मार्गदर्शनात पार पडत आहे. या शिबिरात यशस्वी जयस्वाल, रियान पराग व केसी करीअप्पा हे ओळखीचे चेहरे दिसून आले. या व्यतिरिक्त नव्याने संघाशी जोडले गेलेले अनुनय सिंग, शुभम गढवाल, कुलदीप सेन व कुलदीप यादव हे खेळाडू देखील या शिबीराचा भाग आहेत. संघाचा कर्णधार संजू सॅमसंग हा भारतीय संघाच्या फिटनेस ट्रेनिंग कॅम्पचा भाग असल्याने एनसीएमध्ये आहे. त्याचवेळी संघाने आपली नवी ट्रेनिंग किटही लॉन्च केली. निळ्या व गुलाबी रंगाची ही किट नजरेत भरत आहे. प्रसिद्ध ड्रायफ्रूट ब्रँड हॅपीलो यावर्षी राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रायोजक असतील.
आयपीएल २०२२ साठी राजस्थान रॉयल्स संघ-
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण सेन , ध्रुव जुरेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जिमी नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डॅरिल मिशेल
महत्वाच्या बातम्या-
हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर (mahasports.in)
अखेर राहुल चहर चढला बोहल्यावर! २२ व्या वर्षी बांधली लग्नगाठ (mahasports.in)
नव्या कसोटी क्रमवारीत जडेजा नंबर वन! पंत-विराटही फायद्यात (mahasports.in)