राजस्थान मधील महिला क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयपीएल फ्रॅंचाईजी राजस्थान रॉयल्सने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुपने राजस्थान क्रिकेट असोसिएशनसह नव्या महिला टी20 लीगची घोषणा केली. राजस्थान रॉयल्स महिला चषक या नावाने ही स्पर्धा आयोजित केली जाईल.
राज्यभरातील महिला क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा 16 ते 19 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार असून, ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असेल. जोधपूर शहरात 16 सप्टेंबर रोजी ट्रायल्स होतील. त्यानंतर 17 ते 19 सप्टेंबर या मुख्य स्पर्धेच्या कालावधीत राजस्थान रॉयल्स संघाचे युवा खेळाडू रियान पराग आणि शुभम गढवाल स्पर्धेवेळी खेळाडूंना प्रेरित करतील. राजस्थान रॉयल्सच्या हाय परफॉर्मन्स ऑपरेशन्सचे प्रमुख रोमी भिंडर हे या स्पर्धेसाठी प्रमुख निर्देशक असतील.
6 teams, a player pool of 200 – the Rajasthan Royals Women's Cup is here. 🤩💗 pic.twitter.com/XRMpCZ3wb6
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 15, 2022
या स्पर्धेत सहा संघ सहभागी होतील. या सर्व संघांना राजस्थानमधील शहरांची नावे देण्यात आले आहे. जयपूर वॉरियर्स, जोधपूर ग्लॅडिएटर्स, उदयपूर थंडरबोल्ट्स, अजमेर ब्लेझर्स, कोटा मॅव्हरिक्स आणि बिकानेर स्ट्रायकर्स हे संघ स्पर्धेत सामील होतील. प्रत्येक संघात जास्तीत जास्त 25 खेळाडूंचा समावेश असेल.
राजस्थान रॉयल्स संघाची मालकी रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुपकडे असून, त्यांनी मागील काही काळापासून अनेक नव्या संघांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमधील बार्बाडोस रॉयल्स, नव्या दक्षिण आफ्रिका टी२० लीगमध्ये पार्ल रॉयल्स या संघाची मालकी त्यांनी मिळवलीये. याव्यतिरिक्त पुढील वर्षी सुरु होणाऱ्या महिला आयपीएलमध्ये देखील संघ खरेदी करण्याची इच्छा फ्रॅंचाईजीने व्यक्त केली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. तर, यावर्षी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास संघाने केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, स्टार वेगवान गोलंदाजाचा समावेश
‘या’ कारणांमुळे हुकली रसेल-नरीनची वर्ल्डकप वारी; निवडकर्ते म्हणतायेत, “आता ते…”
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित