राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएलच्या १५व्या हंगामातील पाचवा सामना मंगळवारी (२९ मार्च) पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळण्यात आला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ६१ धावांनी हा सामना खिशात घातला. हा त्यांचा आयपीएल २०२२मधील पहिला विजय होता. या सामन्यात राजस्थानच्या संजू सॅमसनने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी खेळी केली. तसेच, युझवेंद्र चहलनेही उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यामुळे हे दोघेही संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचा हा निर्णय त्याच्यावरच उलटला. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या फलंदाजांनीही विलियम्सनचा हा निर्णय चुकीचा ठरवला. राजस्थान संघाने फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात २१० धावा करत हैदराबादला २११ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला ७ विकेट्स गमावत फक्त १४९ धावाच करता आल्या.
The @rajasthanroyals start their #TATAIPL campaign on a winning note.
Three wickets for @yuzi_chahal and two wickets apiece for Trent Boult and Prasidh Krishna as #RR win by 61 runs.
Scorecard – https://t.co/WOQ4HjEIEr #SRHvRR #TATAIPL pic.twitter.com/5baoMqXxip
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2022
यावेळी हैदराबाद संघाकडून फलंदाजी करताना एडन मार्करमने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४१ चेंडूत नाबाद ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने २ षटकार आणि ५ चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरने १४ चेंडूत ४० धावांची आतिषी खेळी केली. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ५ चौकार मारले. या दोघांशिवाय फक्त रोमारियो शेफर्डने २४ धावांची खेळी केली. इतर कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार केन विलियम्सन तर अवघ्या २ धावांवर तंबूत परतला.
यावेळी राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू युझवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूत ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कलने ४१, जोस बटलरने ३५, शिमरॉन हेटमायरने ३२ आणि यशस्वी जयसवालने २० धावांचे योगदान दिले. या खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणालाही खास कामगिरी करता आली नाही.
यावेळी हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना टी नटराजन आणि उमरान मलिक यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्यांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. यावेळी गोलंदाजी करताना ४ षटके टाकत नटराजनने ४३, तर मलिकने ३९ धावा दिल्या. त्यांच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी १ विकेट खिशात घातली.
आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत प्रत्येक संघांनी आपला एक सामना खेळला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्स संघाने या विजयासह गुणतालिकेत +३.०५० नेट रनरेटसह अव्वल स्थान गाठले आहे.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांमध्ये बुधवारी (३० मार्च) खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ४०० कोटींची घसरण, तर ‘माही’ने घेतली मोठी झेप
माजी क्रिकेटरने सांगितली पाकिस्तानच्या आझमची आयपीएलमधील किंमत; म्हणाला, ‘तो १५-२० कोटींना…’
आयपीएल म्हणजे पैसे छापण्याचीच मशीन; मीडिया हक्कांमधून बीसीसीआय होणार मालामाल