IND vs SL, T20 Series : भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर श्रीलंकेच्या संघाचा कर्णधार चारिथ असलंका आहे. या मालिकेपूर्वीच श्रीलंकेचा स्टार खेळाडू दुष्मंथा चमीरा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. यामुळे श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर झुबिन भरुचा यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंना भारताविरुद्ध जिंकण्यासाठी मदत केली असल्याचे श्रीलंकेचे प्रशिक्षक सनथ जयसूर्याने सांगितले आहे.
प्रशिक्षक सनथ जयसूर्याने खुलासा केला की, “श्रीलंकेचे काही खेळाडू लंका प्रीमियर लीगशी जोडलेले असताना जुबिन भरुचा यांच्यासोबत सहा दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आम्ही लंका प्रीमियर लीगनंतर लगेच शिबीर सुरू केले. बहुतेक खेळाडू लंका प्रीमियर लीगमध्ये खेळत होते, त्यामुळे ते क्रिकेटमध्ये व्यस्त होते आणि त्यांनी जास्तीत जास्त क्रिकेट खेळावे अशी आमची इच्छा होती.”
जयसूर्या पुढे म्हणाला की, “आम्ही झुबिनला राजस्थान रॉयल्समधून आणले आणि आम्ही त्याच्यासोबत सुमारे सहा दिवस काम केले. लंका प्रीमियर लीगमध्ये खेळल्यानंतर इतर क्रिकेटपटूही त्याच्यासोबत सामील झाले. मला वाटते की, खेळाडूंना आता माहिती पडले आहे की, सराव आणि तंत्राच्या बाबतीत व्यवस्थापनाला त्यांच्याकडून काय अपेक्षित असते? आमची तयारी चांगली होती. टी20 सुरू होण्यापूर्वी आमच्याकडे कँडीमध्ये आणखी दोन दिवस आहेत. भरुचा यांच्यासोबतचे सत्र खूप गहन होते आणि खेळाडूंना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.”
रोहित-विराटवर काय बोलला जयसूर्या?
सनथ जयसूर्याने सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूंच्या निवृत्तीचा फायदा श्रीलंकेचा संघ घेईल, अशी अपेक्षा आहे. रोहित, कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी गेल्या महिन्यात विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो म्हणाला की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली हे जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यांची प्रतिभा आणि ते ज्या प्रकारचा क्रिकेट खेळले आहेत, ते पाहता रोहित – विराट आणि जडेजा कुठे उभा आहेत हे आपल्या सर्वांना समजते. त्यांची अनुपस्थिती भारतीय संघाचे नुकसान आहे आणि आम्हाला त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल द्रविड, रवी शास्त्री की गॅरी कर्स्टन, भारताचा सर्वोत्तम प्रशिक्षक कोण? आकडे पाहून बसेल धक्का
अर्शदीप सिंगचं नशीब उजळलं, निवडकर्ते देणार कसोटी मालिकेत मोठी संधी?
एका पाठोपाठ श्रीलंकेला दुसरा झटका! भारतासाठी धोकादायक ठरणारा खेळाडू टी20 मालिकेतून बाहेर