भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. (27 जुलै) रोजी दोन्ही संघ पहिल्या टी20 सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तत्पूर्वी श्रीलंकेचा प्रतिभावान वेगवान गोलंदाज नुवान थुशारा (Nuwan Thushara) बोटाला झालेल्या दुखापतीमुळे टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नुवान थुशाराच्या (Nuwan Thushara) डाव्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, ही दुखापत इतकी गंभीर आहे की, त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. श्रीलंकन संघाचे व्यवस्थापक महिंद्र हलंगोडे यांनी सांगितले की, थुशारा अंडर लाइट सरावात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. त्याच्या जागी दिलशान मदुशंकाचा (Dilshan Madushanka) संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 Nuwan Thushara will not take part in the T20I series, as the player suffered an injury to his left thumb while fielding during practices last night.
A medical report obtained shows a fracture on the player’s left thumb.
Dilshan Madushanka comes into the squad as a… pic.twitter.com/6pq0CzRqy2
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 25, 2024
नुवान थुशारा (Nuwan Thushara) आयसीसी टी20 विश्वचषकामध्ये (ICC T20 World Cup) श्रीलंका संघात होता. त्यानं टी20 विश्वचषकात श्रीलंकेसाठी 3 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 8 विकेट्स त्याच्या नावावर केल्या. थुशारानं 2024मध्ये मार्च महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सलग 3 विकेट्स घेऊन हॅट्रिक घेतली होती. आता भारताविरुद्ध श्रीलंका 3 टी20 आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. तत्पूर्वी श्रीलंकेला एका पाठोपाठ दोन झटके लागले आहेत. याआधी दुश्मंथा चमीरा या मालिकेतून बाहेर पडला होता. तर पाठोपाठ नुवान थुशारा देखील टी20 मालिकेतून बाहेर पडला.
नुवान थुशाराबद्दल (Nuwan Thushara) बोलायचं झालं तर तो 29 वर्षाचा आहे. त्यानं श्रीलंकेसाठी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. तो श्रीलंकेसाठी 11 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. 11 टी20 सामन्यात त्यानं 19 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 7.95 राहिला आहे. तर सरासरी 14.57 आहे. थुशारानं एका डावात 20 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची बेस्ट बाॅलिंग इनिंग आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिक 2024, तिरंदाजीत 36 वर्षांपासून दुष्काळ, यावेळी भारताला पदक मिळणार का?
‘रोहित-विराट-जडेजा’ नसल्यामुळे भारताचे नुकसान निश्चित, टी20 मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, श्रीलंकेमालिकेपूर्वी ‘हिटमॅन’ला मोठा फटका