भारतीय संघसाठी कसोटी सामना खेळावे हे प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते. आता भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे स्वप्न साकार होणार आहे. वास्तविक, निवडकर्ते अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलिया दाैऱ्यासाठी निवड करण्याच्या विचारात आहेत. पांढऱ्या चेंडूत अर्शदीप सिंग भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केला आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात 17 विकेट्स घेऊन टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासोबत बरोबरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर निवडकर्ते खूश असल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे आता अर्शदीप सिंगची प्रमोशन होण्याची शक्यता आहे. त्याचा आता ऑस्ट्रेलिया दाैऱ्यावर कसोटी संघात प्रवेश होण्याची शक्यता आहे.
टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार अर्शदीपचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या माध्यमातून भारतीय कसोटी संघात समावेश करण्याचा विचार केला जात आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्यासाठी अर्शदीपला दुलीप ट्रॉफीचे काही सामने खेळण्यास सांगितले आहे.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये एका सूत्राने सांगितले की, “अर्शदीपने भारतासाठी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये प्रभावीपणे चेंडू स्विंग आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड होण्याची शक्यता वाढवण्यासाठी, 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी त्याचा विचार केला जाईल. “काही घरगुती लाल-चेंडूचे क्रिकेट खेळण्यास सांगितले जाऊ शकते.”
Selectors are considering to pick Arshdeep Singh in the Border Gavaskar Trophy in November. [Gaurav Gupta from TOI]
– Arshdeep is likely to play in the Duleep Trophy in September. pic.twitter.com/PsrQ2x29L5
— Johns. (@CricCrazyJohns) July 25, 2024
भारतीय संघ या वर्षाच्या शेवटी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दाैरा करणार आहे. या दाैऱ्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये 5 सामन्यांची बाॅर्डर गावस्कर मालिका खेळवली जाणार आहे. मागील दोन्हीवेळेस भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन धोबीपछाड दिले आहे. आश्या परिस्थितीत भारतीय संघ तिसऱ्यावेळी कांगारुंना ऑस्ट्रेलियामध्ये धूळ चारण्यास नक्कीच प्रयत्नशील असेल.
हेही वाचा-
एका पाठोपाठ श्रीलंकेला दुसरा झटका! भारतासाठी धोकादायक ठरणारा खेळाडू टी20 मालिकेतून बाहेर
ऑलिम्पिक 2024, तिरंदाजीत 36 वर्षांपासून दुष्काळ, यावेळी भारताला पदक मिळणार का?
‘रोहित-विराट-जडेजा’ नसल्यामुळे भारताचे नुकसान निश्चित, टी20 मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य