---Advertisement---

राजस्थानने गोलंदाजीचा निर्णय घेत गुजरातला दिले फलंदाजीचे आमंत्रण

On: बुधवार, एप्रिल 9, 2025 7:20 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 23 वा सामना आज (9 एप्रिल) रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. गुजरात टायटन्स हा संघ शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली तसेच राजस्थान रॉयल्स हा संघ संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे व गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे.

गुजरातने आता पर्यंत 4 सामने खेळले व त्यापैकी 3 सामन्यात सलग विजय मिळवला आहे. त्याचबरोबर राजस्थानने आत्तापर्यंत 2 सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन :

गुजरात टायटन्स – साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर , शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---