रणजी ट्रॉफी २०२२ चा अंतिम सामना सध्या सुरू आहे. मुंबई आणि मध्य प्रदेश संघांनी यावर्षी स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन केले आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शुक्रवारी (२४ जून) मध्ये प्रदेशच्या रजत पाटीदारने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी पाटीदारने धमाकेदार प्रदर्शन केले होते, तसेच प्रदर्शन त्याने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात देखील केले आहे.
आयपीएल २०२२ मध्ये रजत पाटीदार शेवटच्या सामन्यांमध्ये आरसीबीसाठी महत्वाचा खेळाडू ठरला. त्याने स्वतःच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती. रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करताना देखील त्याने काही निर्णायक सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला मुंबईचे लक्ष्य गाठण्यासाठी हातभार लावला. त्याने १०६ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद ६७ धावा केल्या आहेत. कर्णधार आदित्य श्रीवास्तव (१०*) आणि पाटीदार खेळपट्टीवर कायम आहेत.
Yash Dubey & Shubham Sharma's solid tons and Rajat Patidar unbeaten 67 on Day 3 of the @Paytm #RanjiTrophy #Final brought Madhya Pradesh within touching distance of Mumbai's first-innings total. 👏 👏 #MPvMUM
Watch the highlights 🎥 🔽https://t.co/EJcZG8SROY pic.twitter.com/zsjI9xWCsr
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 24, 2022
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मध्य प्रदेशचे शुभम शर्मा आणि यश दुबे अनुक्रमे ४१* आणि ४४* धावा करून खेळपट्टीवर कायम होते. या दोघांनी तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. दुबेने ३३६ चेंडूत १३३ धावा केल्या. तर शुभमने २१५ चेंडूत ११६ धावा केल्या. या दोघांचे शतक आणि पाटीदारचे नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मध्य प्रदेश संघ मुंबईपेक्षा अवघ्या ६ धावांनी मागे आहे.
मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ३७४ धावा करून संघ सर्वबाद झाला. यामध्ये त्यांच्या सरफराज खानने २४३ चेंडूत १३४ धावा उभ्या केल्या. अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे आणि मुंबई संघाची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी मध्य प्रदेश संघ सर्वप्रथम मुंबईला मागे टाकणार आणि मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात दिसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर पाकिस्तानी खेळाडूंची चांंदी होणार!, पीसीबीने उचलले धाडसी पाऊल
ENG vs NZ | डॅरिल मिचलचे मालिकेतील तिसरे शतक, मोडला सचिन अजहर अन् चंद्रपालचा विक्रम
रणजी ट्रॉफीची फायनल पहिल्यांदा खेळणाऱ्या ‘या’ जोडीने काढला मुंबईचा घाम!