इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या मागच्या हंगामात रजत पाटीदारने धमाकेदार खेळी केली होती. पाटीदारच्या या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर आरसीबी संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. पण आयपीएल 2023 पूर्वी पाटीदारला दुखापत झाल्याचे समोर आले होते. मंगळवारी (4 एप्रिल) त्याने आयपीएल 2023 मधून माघार घेतल्याचे समोर येत आहे.
फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघ यावर्षी आपला पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला. 2 एप्रिल रोजी झालेल्या या सामन्यात आरसीबीने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. पण यामध्ये संघाचा वरच्या फळीतील फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) मात्र नव्हता. पाटीदार आपल्या पायाच्या टाचेचा झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दुखापतीमुळे पाटीदार आयपीएलच्या आगामी हंगामातील सुरुवातीचे सामने खेळणार नाही, असे सांगितले गेले होते. पण मंगळवारी त्याने संपूर्ण हंगामातून माघार घेतल्याची माहीती आरसीबीचे प्रशिभक संजय बांगर यांनी दिली.
येत्या सामन्यांमध्ये आरीसीबीला या महत्वाच्या फलंदाजाची कमतरता जाणवू शकते. दुखापतग्रस्त पाटीदार मागच्या काही दिवसांपासून बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. याठिकाणी तो आपल्या दुखापतीवर काम करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार पाटीदारला दुखापतीतून सावरण्यासाठी मोठ्या विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे. तसेच मैदानात पुनरागमन करण्यापूर्वी त्याला आपली फिटनेस देखील सिद्ध करावी लागणार आहे.
आरसीबीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी माहिती देताना म्हटले,
“आम्ही एनसीएमध्ये रजतबाबत चर्चा केली. आम्हाला अपेक्षा होती की तो अर्ध्या हंगामात तरी संघाचा भाग होईल. त्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र, एकूण चर्चेअंती त्याच्या भविष्याबाबत विचार करून निर्णय घेण्यात आला की तो या हंगामात खेळणार नाही.”
दरम्यान, पाटीदारचे मागच्या हंगामातील प्रदर्शन आपण पाहिले, तर त्याने 7 डावांमध्ये 152.75 च्या स्ट्राईक रेटने 333 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक देखील सामील होते. मागच्या हंगामातील दुसऱ्या क्लॉलिफायर सामन्यात आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने होते. या सामन्यात पाटीदारने आरसीबीसाठी सर्वाधिक 58 धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तसेच लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळताना पाटीदारने आरसीबीसाठी नाबाद 112 धावा कुटल्या होत्या. (Rajat Patidar out of IPL 2023 due to injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीने सामनाच नाही, तर मनेही जिंकली; विजयानंतर ‘माही’चा अन् गौतमच्या मुलीचा प्रेमळ फोटो तुफान व्हायरल
शेवटच्या सामन्यात पालघर काझीरंगा रहिनोस संघाची रायगड मराठा मार्वेल्स संघावर मात