---Advertisement---

आरसीबीसाठी जॅकपॉट ठरणार ‘हा’ खेळाडू? केवळ ४९ चेंडूत झळकावल्यात १०४ धावा 

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 11:32 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 हंगामास 9 एपिल पासून सुरूवात होणार असून यंदाचे आयपीएल विजेतेपद मिळवण्यासाठी सर्व संघांतील खेळाडूंनी कसून तयारी केली आहे. तत्पूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्या संघात असा एक खेळाडू तयार होत आहे, जो कदाचीत त्यांच्यासाठी जॅकपॉट ठरु शकतो.

मंगळवारी (6 एपिल) आरसीबीच्या सराव सामन्यात उजव्या हाताचा फलंदाज रजत पाटीदारने केवळ 49 चेंडूत 104 धावा फटकावल्याचे सांगितले जात आहे. या नवख्या फलंदाजाने आरसीबीच्या इतर गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रजतच्या स्फोटक फलंदाजीमुळे त्याच्या संघाने 19.2 षटकांत 226 धावांचे लक्ष्य गाठले.

आरसीबी संघाने या हंगामात रजत पाटीदार या खेळाडूला अवघ्या 20 लाख रुपयांत विकत घेतले आहे. तो मागील खूप दिवसांपासून तीनही क्रिकेट स्वरूपात मध्यप्रदेश संघासाठी खेळत असून त्याने प्रथम श्रेणीच्या 36 सामन्यांमध्ये 2253 धावा केल्या आहेत. तर अ दर्जाच्या सामन्यांमध्ये त्याने 35.6 च्या सरासरीने 1246 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी20 मध्ये 36 च्या सरासरीने आणि 143.6 च्या स्ट्राइक रेटने त्याने 699 धावा केल्या आहेत.

आयपीएल 2021 साठी आरसीबी संघ –
विराट कोहली (कर्णधार),एबी डिविलियर्स, ऍडम झम्पा, डॅन ख्रिस्टियन, डॅनियल सॅम्स, देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, फिन ऍलेन, केन रिचर्डसन, केएस भरत, काइल जेमिसन, मोहम्मद अजहरुद्दीन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, रजत पाटीदार, सचिन बेबी, शाहबाज अहमद ,सुयश प्रभुदेसाई ,वॉशिंगटन सुंदर ,युजवेंद्र चहल.

महत्त्वाच्या बातम्या –

मागील हंगामाप्रमाणे १४ व्या आयपीएल हंगामातही चेन्नई प्लेऑफमध्ये पोहणार नाही, ‘या’ तीन दिग्गजांचा दावा

आयपीएलवर कोरोनाचे काळे ढग! स्पर्धेला सुरुवातही झाली नाही तर खेळाडूंपासून, ब्रॉडकास्टर, ग्राऊंड्स स्टाफही पॉझिटिव्ह

“पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असणे म्हणजे नेहमीच ४० चेंडूत शतक करणे नव्हे”, इंग्लंडच्या क्रिकेटरने सुनावले खडेबोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---