लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) १४ धावांनी विजय मिळवला. यासब आरसीबीने त्यांचे क्वालिफायर २ चे तिकीट पक्के केले आहे. आरसीबीच्या या विजयाचा शिल्पकार राहिला, रजत पाटीदार. पाटीदारने आपल्या तोबडतोब शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीला महत्त्वपूर्ण सामना जिंकून दिला. त्याच्या उल्लेखनीय खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यानंतर त्याने आपल्या खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
पाटीदारने या सामन्यात ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा (Rajat Patidar Century) फटकावल्या. २०७.४१च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या. तसेच या खेळीदरम्यान त्याने ७ षटकार आणि १२ चौकारही मारले. अशाप्रकारे पाटीदारने केवळ षटकार-चौकारांच्या मदतीनेच ९० धावा कुटल्या. या शानदार खेळीदरम्यान आपले लक्ष चेंडूवरच होते. खेळपट्टी खूप चांगली होती आणि याचमुळे आपण काही चांगले शॉट खेळू शकल्याचे पाटीदारचे (Rajat Patidar Statement About His Knock) म्हणणे आहे.
पाटीदार म्हणाला की, “मी जेव्हा चेंडूला हिट करत होतो, तेव्हा माझे पूर्ण लक्ष्य चेंडूवरच होते. पावरप्लेमधील शेवटच्या षटकात जेव्हा कृणाल पंड्याच्या (krunal Pandya) षटकात मी १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २० धावा काढल्या होत्या. त्याचा सामना करताना मी माझ्या योजनांना प्रत्यक्ष अंमलात आणले. तेव्हाच मला जाणवले की, मी आज मोठी खेळी करू शकतो. खेळपट्टी खूप चांगली होती आणि मी काही चांगले फटकेही मारले. महत्त्वाचे म्हणजे, मला खेळताना कसलाही दबाव जाणवत नाही. कारण माझ्यामध्ये माझ्या कमतरांना भरून काढण्याची क्षमता आहे.”
आरसीबीने पाटीदारला मेगा लिलावात खरेदी केले नव्हते. अनसोल्ड राहिलेल्या पाटीदारला आरसीबीने लवनीथ सिसोदियाला दुखापत झाल्यानंतर त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून २० लाखांमध्ये आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. याबद्दल बोलताना पाटीदारने म्हटले की, “आयपीएल २०२१ नंतर मी क्लब क्रिकेटमध्ये व्यस्त झालो होतो. मागील हंगामानंतर मला लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. परंतु या गोष्टी माझ्या नियंत्रणात नव्हत्या. मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एलिमिनेटरचा वाईट इतिहास पुसत बेंगलोरची क्वालिफायर २मध्ये ‘रॉयल’ एन्ट्री, विजयाचा जल्लोष बघण्यासारखा
लेट पण थेट! हुड्डाची विकेट घेत हसरंगाचा नाद खुळा विक्रम; ताहिर अन् चहलसोबत खास यादीत सामील
रेड कार्डच्या स्पर्धेत डायनामाईट्सचा युनिक वानवडीवर विजय