भारताला चौथ्या कसोटीत विजयासाठी 192 धावांचे आव्हान असताना रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने 84 धावांची सलामी दिली. रोहित अर्धशतकाजवळ पोहचला होता तर यशस्वी आक्रमक फटके मारण्याच्या नादात यशस्वी जैस्वाल 37 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर रोहित बाद झाल्यानंतर आलेला पाटीदारी देखील शुन्यावर बाद झाला. भारताची अवस्था 1 बाद 99 धावांवर 3 बाद 100 धावा अशी झाली होती.
अशा परिस्थितीत भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदार अचानक चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत रजत पाटीदारची खराब कामगिरी कायम आहे. रांची येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रजत पाटीदार खाते न उघडता बाद झाला आहे. त्यानंतर रजत पाटीदारला त्याच्या खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
याबरोबरच, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सहा डावांमध्ये रजत पाटीदारने एकदाही 40 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. तसेच रजत पाटीदारने या मालिकेतील 3 कसोटी सामन्यांच्या 6 डावात 32, 9, 5, 0, 17, 0 धावा केल्या आहेत. रजत पाटीदारने 3 कसोटी सामन्यांच्या 6 डावात एकूण 63 धावा केल्या आहेत. यामुळे . सोशल मीडियावर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.
तसेच रजत पाटीदारला विराट कोहलीच्या गैरहजेरीत चौथ्या क्रमांकावर रजत पाटीदारच्या अपयशामुळे टीम इंडियाला मालिकेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रजत पाटीदार बेजबाबदारपणे बाहेर पडत आहेत. आता रजत पाटीदारच्या कसोटी कारकिर्दीसाठी धोक्याची घंटा वाजत आहे. देवदत्त पडिक्कलसारखे फलंदाज संधीची वाट पाहत आहेत.
Thank You Rajat Patidar 🦆
You will not be remembered #RajatPatidar #INDvENG pic.twitter.com/JNHOyYFkMF
— sarcastic (@Sarcastic_broo) February 26, 2024
दरम्यान, देवदत्त पडिक्कलने त्याच्या शेवटच्या 10 प्रथम श्रेणी डावांमध्ये 30, 193, 42, 31, 103, 105, 65, 21, 151 आणि 36 धावा केल्या आहेत. या काळात देवदत्त पडिक्कलची फलंदाजीची सरासरी ७७.७ आहे. देवदत्त पडिक्कलने त्याच्या शेवटच्या 10 प्रथम श्रेणी डावांमध्ये 4 शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये 151 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : रोहित शर्मा आणि जेम्स अँडरसन यांच्यात बाचाबाची! घ्या जाणून नेमंक काय आहे कारण
- IPL 2024 : पीएसएलदरम्यान हवा फक्त RCB ची, स्टेडियममध्ये पाहायला मिळाले RCB चे चाहते अन्…