भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 20 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर 2 धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या या अर्धशतकी खेळीत 5 चौकार आणि 1 सिक्सचा समावेश होता. रोहितने अर्धशतकासाठी 69 चेंडूंचा सामना केला. रोहितचा स्ट्राईक रेट या दरम्यान 72.46 इतका होता. तसेच रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील हे 17 वं अर्धशतक ठरलं आहे.
याबरोबरच भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या रांची कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंडचा महान खेळाडू जेम्स अँडरसन यांच्यात जोरदार बाचाबाची झालेली पहायला मिळाली आहे. तसेच रांची कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ही घटना घडली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच रोहित शर्मा आणि अँडरसन यांच्यात बाचाबाची सुरू झाली होती. तसेच हा संपूर्ण प्रकार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल अँडरसनच्या चेंडूवर एक धाव घेत असताना ही घटना घडली आहे.
SOME EXCHANGE OF WORDS BETWEEN ROHIT SHARMA AND ANDERSON!!!
ANDERSON GOT FRUSTRATED AFTER ROHI SMASHED HIM FOR SIX💪🏼💪🏼🔥..!!! #DhruvJurel #DhruvRathee #DhruvRathi #KuldeepYadav #RohitSharma #INDvsENG #INDvENG #SarfarazKhan #ashwin #CricketTwitter #anderson #ViratKohli pic.twitter.com/5JTW8s5Mjn
— Crazy Arpita (@ArpitaKiVines) February 26, 2024
तसेच सामन्याच्या चौथ्या दिवशी जेम्स अँडरसनच्या चेंडूवर रोहित शर्माने शानदार षटकार देखील मारला होता. यावर स्टोक्सची प्रतिक्रिया देखील व्हायरल होत आहे. दरम्यान, अँडरसनच्या एका चेंडूवर रोहित आणि यशस्वीने एकेरी घेतली तेव्हा कर्णधार आणि अँडरसनमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर रोहित शर्मानेही अँडरसन खणखणीत उत्तर दिले आहे.
Some exchange of words between Rohit Sharma and Jimmy Anderson.
It seems that Jimmy's ego is hurt by Hitman hitting him for a six.
But he should be grateful that he has been hit for a six by the greatest six-hitter of all time. pic.twitter.com/0L6B4xh75g
— Vishal. (@SPORTYVISHAL) February 26, 2024
दरम्यान, रोहित आणि अँडरसनमध्ये काय चर्चा झाली ते माईकमध्ये रेकॉर्ड होऊ शकले नाही, पण दोन्ही खेळाडू ज्या पद्धतीने एकमेकांकडे बघत होते, त्यावरून काहीतरी वाद झाल्याचे दिसत होते. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 40 धावा केल्या. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या दोघांनी चौथ्या दिवसाची आश्वासक सुरुवात केली. मात्र जो रुटच्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वाल कॅच आऊट झाला आणि टीम इंडियाने पहिली विकेट गमावली होती.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : पीएसएलदरम्यान हवा फक्त RCB ची, स्टेडियममध्ये पाहायला मिळाले RCB चे चाहते अन्…
- IND vs ENG : महेंद्रसिंग धोनीचे रांची कसोटी दरम्यान व्हायरल झाले पहिले नियुक्ती पत्र, पाहा फोटो