आयपीएल इतिहासाच्या पहिल्या हंगामाचा चॅम्पियन संघ राजस्थान रॉयल्स त्यांच्या दुसऱ्या विजेतेपदाची वाट पाहत आहे. राजस्थान रॉयल्सला गेल्या अनेक वर्षांपासून हे दुसरे विजेतेपद जिंकता आलेले नाही. यावेळी मेगा लिलावात अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या संघात स्थान दिल्यानंतर, राजस्थान रॉयल्स आयपीएल 2025 मध्ये धमाल करण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण आता रॉयल्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ राजस्थान रॉयल्ससाठी एक वाईट बातमी येत आहे. ज्यामध्ये त्यांच्या संघातील एका स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे आणि या खेळाडूला पुढील 2 ते 3 महिने बाहेर राहावे लागू शकते. जे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का देऊ शकते.
तो खेळाडू दुसरा कोणी नसून स्टार वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून गोलंदाजी कौशल्य दाखवणाऱ्या तुषार देशपांडेच्या घोट्याची दुखापत पुन्हा एकदा समोर आली आहे. दुखापतीत परतणाऱ्या देशपांडेला, पुन्हा एकदा बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागू शकते. या दुखापतीमुळे तो आता 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यातील काही सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तो मुंबई संघाचा भाग आहे आणि त्यांचा 23 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीर विरुद्ध सामना आहे.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात, राजस्थान रॉयल्सने तुषार देशपांडेवर मोठी पैज लावली होती. संघाने त्याला 6.50 कोटी रुपयांना खरेदी केले. जर तुषार देशपांडेही आयपीएलमधून बाहेर पडला तर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी विभागासाठी हा मोठा धक्का असेल.
मीडिया रिपोर्ट्समध्ये आसा दावा करण्यात आला आहे की, “तुषारची दुखापत पुन्हा उफाळून आली आहे, ज्यामुळे त्याला पुढील दोन ते तीन महिने खेळापासून दूर राहावे लागू शकते.”
हेही वाचा-
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत ‘अ’ संघ या टीमविरुद्ध सामना खेळणार
नितीश कुमार रेड्डीचं नशीब चमकलं, मुख्यमंत्र्यांकडून मिळालं लाखोंचं बक्षीस
BCCI; नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूंवर होणार कडक कारवाई, पाहा काय आहे शिक्षा